हिंजवडी - माण रस्त्यावरील बोडके वाडी फाटा पाण्याखाली; आयटी पार्क मधील वाहतूक मंदावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 09:56 IST2024-07-25T09:55:57+5:302024-07-25T09:56:29+5:30
आयटीपार्कला जोडणारा महत्वाचा माण हिंजवडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. बोडके वाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे.

हिंजवडी - माण रस्त्यावरील बोडके वाडी फाटा पाण्याखाली; आयटी पार्क मधील वाहतूक मंदावली
हिंजवडी : आयटीपार्क परिसरात मागील चोवीस तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली झाली आहे. आयटीपार्कला जोडणारा महत्वाचा माण हिंजवडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. बोडके वाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे.
त्यात, साचलेल्या पाण्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाल्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रामुख्याने, येथील गवारेवाडी आणी बोडकेवाडी फाट्यावर रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली आहे. दरम्यान, जगविख्यात आयटी पार्क मधील बहुतांश रस्त्यांची आधीच खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यात, मागील चोवीस तासाहून अधिक काळ, माण, हिंजवडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक मंदावली आहे.