मेट्रोसाठी पालिकेच्या १७ जागा विनानिविदा भाड्याने देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:03 AM2019-02-19T02:03:42+5:302019-02-19T02:04:01+5:30

कामाचा वेग वाढणार : शहर सुधारणा समितीची मान्यता

Hire the bid for 17 seats of the Municipal Corporation | मेट्रोसाठी पालिकेच्या १७ जागा विनानिविदा भाड्याने देणार

मेट्रोसाठी पालिकेच्या १७ जागा विनानिविदा भाड्याने देणार

Next

पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पाेरेशन लिमिटेडला पालिकेच्या मालकीची ३ हजार १४ चौरसमीटर जागा विनानिविदा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली. यामध्ये आनंदनगर, कोथरूड उद्यान, पुलाची वाडी, सी.टी.एस., संभाजी उद्यान, शिवाजीनगर, मनपा भवन, एलबीटी विभाग, ममता हॉटेलची जागा, बंडगार्डन, बालगंधर्व रंगमंदिर आदी १७ जागांचा समावेश आहे

याबाबत, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पाेरेशन लिमिटेड या केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीतर्फे मेट्रो उभारणीचे काम चालू आहे. महामेट्रोचे कार्यकारी संचालक यांनी मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक जागा पुणे मेट्रो प्रकल्पासाठी उपलब्ध करून मिळणेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. मेट्रो स्टेशनचे एन्ट्री-एक्झिट, लिफ्ट, फुटओवर ब्रीज आदी वापराकरिता उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
कामाची तातडी, उपयुक्तता विचारात घेता जागा महामेट्रोस त्वरित देणे गरजेचे आहे. महापालिकेच्या जागा किमान चालू बाजारभावाने भाडेपट्टा अथवा विक्री करून देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मिळकत वाटप नियमावली वगळता कोणत्याही मिळकतीचा विनियोग जाहीर निविदा मागवून करण्यात यावा, असे नमूद आहे.

देखभाल व सुरक्षिततेची जबाबदारी महामेट्रोकडे
१ महापालिकेच्या स्वमित्वापोटी दर वर्षी १ रुपया या नाममात्र दराप्रमाणे ३० वर्षे कालावधीसाठी महामेट्रोस हस्तांतरित करण्यात यावेत, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्यालगत असणाऱ्या परिसराची देखभाल आणि संरक्षण-सुरक्षितता याची जबाबदारी मेट्रोने पार पाडावी.
२ वर्किंग स्पेस म्हणून लागणारी जागा काम झाल्यानंतर पूर्व स्थितीत करून देणे महामेट्रोवर बंधनकारक असावे. उद्यानात येणाºया नागरिकांना,तसेच सेवकांना कोणताही त्रास होणार नाही. तसेच, त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी मेट्रो रेल कार्पाेरेशन यांनी घेणे आवश्यक आहे महामेट्रोने केलेल्या बांधकामाच्या देखभाल दुरुस्ती सर्व जबाबदारी महामेट्रोकडे राहील, असे मेगडे यांनी सांगितले.
 

Web Title: Hire the bid for 17 seats of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.