...त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत; वसंत मोरेंना पुण्यातून शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 03:55 PM2022-04-10T15:55:54+5:302022-04-10T15:56:11+5:30

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कारवाई झालेले नगरसेवक वसंत मोरे यांच्यासाठी शिवसेनाच योग्य आहे. त्यांनी शिवसेनेत यावे, शिवसैनिक त्यांचे ...

His big friends are still in Shiv Sena Vasant More Shiv Sena only benefits | ...त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत; वसंत मोरेंना पुण्यातून शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण

...त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत; वसंत मोरेंना पुण्यातून शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कारवाई झालेले नगरसेवक वसंत मोरे यांच्यासाठी शिवसेनाच योग्य आहे. त्यांनी शिवसेनेत यावे, शिवसैनिक त्यांचे स्वागतच करतील, असे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिकूल मत व्यक्त केल्यावर ठाकरे यांनी मोरे यांना शहराध्यक्षपदावरून तडकाफडकी दूर केले. त्यानंतर मोरे यांना वेगवेगळ्या पक्षांकडून बोलावले जात आहे. त्यांनी मात्र अद्याप यावर काहीही जाहीर भाष्य केलेले नाही. त्यांना ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत बोलावले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले की, वसंत मोरे शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागतच आहे. ही कारवाई होण्याच्या आधीच माझी त्यांची भेट झाली होती. राज ठाकरे यांचे एकूण नेतृत्व लक्षात घेतले तर ते तुमच्या वक्तव्यावर काहीतरी ॲक्शन नक्की घेतील, असे मी त्यांना सांगितले होते. त्याचवेळी त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रणही दिले. ते जुने शिवसैनिकच आहेत. त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत आहे. त्यामुळे त्यांची काहीच अडचण होणार नाही, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

वसंत मोरे यांच्यावरील कारवाई दुर्दैवी आहे. मनसेच्या स्थापनेपासून ते काम करत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना काहीही न सांगता त्यांच्यावर थेट कारवाई करणे योग्य नाही, मात्र हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे मत संजय मोरे यांनी व्यक्त केले.

Web Title: His big friends are still in Shiv Sena Vasant More Shiv Sena only benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.