Pune | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पुरंदर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:35 AM2023-02-27T10:35:54+5:302023-02-27T10:36:35+5:30

माळशिरस येथील पतीकडून पत्नीचा खून...

His wife was killed on suspicion of character; Incidents in Purandar Taluk | Pune | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पुरंदर तालुक्यातील घटना

Pune | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पुरंदर तालुक्यातील घटना

googlenewsNext

सासवड (पुणे) : माळशिरस (ता. पुरंदर) येथील विवाहितेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना आंबोडी (ता. पुरंदर) येथील वन विभागाच्या परिसरात घडली. अनिता महेश बनकर (वय- २५) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. आरोपी पती महेश पंडीत बनकर (वय- ३०) यास सासवड पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान  मयताचा भाऊ अनिल हनुमंत चव्हाण (मार्केटयार्ड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पाच वर्षांपूर्वी बहीण अनिता हिचे लग्न महेश बनकर यांच्याबरोबर झाले. तिला एक मुलगी (वय- ४) व मुलगा (वय- १) दोन मुले आहेत.  महेश बनकर हे मार्केट यार्डमध्ये दिवाणजीचे काम करतात. मागील चार वर्षे अनिताला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर महेशने अनिताला त्रास देणे सुरू केले. तो कामावर न जात दारू पीत होता. तो दारू पिऊन अनिताला मारहाण करायचा. महेश अनिताच्या चारीत्र्यावर संशय घेत होता. अनिताची सासू कमल बनकर ही तू नीट वागत नाही म्हणून त्रास देत होती, असं फिर्यादीत म्हटलं आहे.

शनिवार (दि. २५) सकाळी अनिता नऊच्या सुमारास कामाला गेली. अनिता काम संपल्यानंतर अकरा वाजता घरी येते. परंतु ती घरी आली नाही. ती ज्या ठिकाणी काम करते तिथे जास्त काम होते म्हणून उशीर होईल असे आईला सांगून गेली होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ज्या ठिकाणी कामाला जाते त्या मालकाचा फोन आला. अनिता मरण पावली आहे. तुम्ही सासवड चौकीला जावा त्यानंतर मी महेश याला फोन केला परंतु त्याचा फोन बंद येत होता. त्यानेच माझ्या बहिणीला मोटरसायकलवर बसवून घेऊन गेला होता असे गल्लीतील लोक म्हणत होते. तो फोन बंद करून गायब झाला आहे. त्यानेच माझ्या बहिणीचा खून केला आहे अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहे.

Web Title: His wife was killed on suspicion of character; Incidents in Purandar Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.