महाराष्ट्रात पुरंदर आणि सासवडचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण - शिवशाहीर पुरंदरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:27+5:302021-08-27T04:16:27+5:30
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शताब्दी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ...
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शताब्दी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जयसाहेब पुरंदरे, सचिव शांताराम पोमण, मुंबईचे माजी मुख्य न्यायदंडाधिकारी रवींद्र घाटे, माजी उपनगराध्यक्ष खाजाभाई बागवान, माजी नगरसेवक डॉ. राजेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची पताका खांद्यावर घेऊन जगभर मिरविणारे आणि पुरंदरचा सन्मान वाढवणारे हिमालयाच्या उंचीचे व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभले, अशा शब्दांत आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. राजेश दळवी यांनी सूत्रसंचालन केले तर शांताराम पोमण यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : २६ सासवड पुरंदर
फोटो ओळ : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करताना विजय कोलते.
260821\dsc_0297.jpg
फोटो ओळ ; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करताना विजय कोलते यांच्यासह मान्यवर.