ऐतिहासिक परंपरा पुस्तकरुपात

By Admin | Published: December 20, 2014 11:45 PM2014-12-20T23:45:35+5:302014-12-20T23:45:35+5:30

पर्यटन क्षेत्राशी संबंधित अद्ययावत माहिती दर्शविणारे तसेच शहराच्या ऐतिहासिक परंपरेची माहिती देणारे कॉफीटेबल बुक तयार काण्यात येणार आहे.

Historical tradition books | ऐतिहासिक परंपरा पुस्तकरुपात

ऐतिहासिक परंपरा पुस्तकरुपात

googlenewsNext

पुणे : शहरातील पर्यटन व्यावसायाला चालना देण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित अद्ययावत माहिती दर्शविणारे तसेच शहराच्या ऐतिहासिक परंपरेची माहिती देणारे कॉफीटेबल बुक तयार काण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत हे पुस्तक तयार करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याची
माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.
ऐतिहासिक शहर असलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरातत्त्व वास्तू आहेत. यासोबतच प्राचीन मंदिरे आणि गडकोट अनेक आहेत. शहरातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील पर्यटनस्थळांची सचित्र माहिती जगभरातील पर्यटकांना मिळावी यासाठी वेबसाईट सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेकदा महापालिकेत विविध देशांमधील राजकीय तसेच प्रशासकीय प्रतिनिधी भेट देतात. तर महापालिकेचे पदाधिकारीही परदेशातील शहरांना भेट देतात. अशा वेळी त्या ठिकाणी महापालिकेची माहिती पुस्तकस्वरूपात उपलब्ध करून दिल्यास ती कायमस्वरूपी त्यांच्याजवळ उपलब्ध राहील
तसेच शहराची माहितीही एकाच पुस्तकात उपलब्ध होईल या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे धनकवडे म्हणाले. त(प्रतिनिधी)

च्या पुस्तकात ऐतिहासिक पुण्यापासून आतापर्यंतच्या पुण्याची वाटचाल चित्रबद्ध आणि शब्दबद्ध स्वरूपात असणार आहे. त्यासाठीचे काम जाणकार पुणेकरांना सोबत घेऊन त्यांच्यामार्फत तज्ज्ञांच्या समितीतून हे पुस्तक साकारले जाणार आहे.
च्हे पुस्तक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार असून, त्यात पुणे शहराने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती आणि शहरास मिळालेली नवनवीन ओळख याचाही समावेश असणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Historical tradition books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.