व्यंगचित्रातून इतिहास घडू शकतो
By admin | Published: November 25, 2015 12:44 AM2015-11-25T00:44:50+5:302015-11-25T00:44:50+5:30
चित्रकलेत व्यंगचित्रांना महत्त्वाचे स्थान आहे. व्यंगचित्रातून इतिहासही घडू शकतो, असे मत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्ते केले.
पुणे : चित्रकलेत व्यंगचित्रांना महत्त्वाचे स्थान आहे. व्यंगचित्रातून इतिहासही घडू शकतो, असे मत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्ते केले.
सरस्वती लायब्ररी व साहित्यवेध प्रतिष्ठान पुणे तर्फे सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकार
झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व ८९ अध्यक्षांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादान येथे भरविण्यात आले आहे. प्रर्दशन उद्घाटनच्या प्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते अर्कचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ सबनीस यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यंदाचे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी, अ.भा. मराठी साहित्य संमेलन २०१५ चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सुरेश लोटलीकर, कोहिनूर
ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, एमआयटी पुणेचे प्रकाश जोशी, स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे, कैलास भिंगारे उपस्थित होते. डॉ सबनीस म्हणाले, व्यंगचित्रातून इतिहास घडू शकतो. बाळासाहेबांच्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून शिवसेनेचा जन्म झाला. तसेच व्यंगचित्रे पाहिल्यानंतर रसिकांच्या मनात गुदगूली झाली पाहिजे. आणि अशी गुदगुली बाळासोहब व आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातून अनुभवायला मिळते.
८८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन महाराष्ट्राबोहर आयोजित केल्यामुळे वेगवेगळ््या लोकांनी विरोध दर्शवला होता. परंतू आगामी साहित्य संमेलन हे फक्त आर्थिक अंगाने भव्यदिव्य होणार नसून सात्विकतेने व नैतिकतेने भव्यदिव्य होणार आहे. तसेच संमेलनातून येणारा संपूर्ण निधी दुष्काळ ग्रस्तांना देणार असल्याची माहिती सबनीस यांनी दिली. डॉ मोरे म्हणाले, साहित्य संमेलन हा एक गाडा आहे. (प्रतिनिधी)