इतिहासाला भौगोलिक दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:31 AM2021-02-20T04:31:59+5:302021-02-20T04:31:59+5:30
नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे ...
नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ. हिमालया सकट, डॉ. राजेंद्र सरोदे, प्रा. भगवान गावित, प्रा. पौर्णिमा कारळे, प्रा. जीवन गायकवाड, डॉ. सचिन घाडगे, प्रा. प्रवीण गायकवाड, प्रा. प्रल्हाद ननावरे, प्रा. अतुल मरेवाड, डॉ. जगदीश शेवते, प्रा. संदीप लांडगे, विद्यार्थी व महेश दळवी, स्वप्नील सरपाले आदी उपस्थित होते.
डॉ. प्रमोदकुमार हिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पराक्रमांपैकी अफजलखानाचा वध हा पराक्रम विद्यार्थ्यांसमोर उभा करून शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीच्या, चातुर्याच्या, भौगोलिक ज्ञानाच्या, तसेच सर्वसामान्यांना माहिती नसलेल्या गोष्टीच्या जोरावर अफजलखानाला ठार मारून आपला विजयी झेंडा प्रतापगडावर कसा रोवला, याचा पूर्ण देखावा अतिशय सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला.
प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जगदीश शेवते यांनी केले तर आभार प्रा. संदीप लांडगे यांनी मानले.