काॅफीटेबल बुकद्वारे उलगडला पुण्याच्या गणेशाेत्सवाचा इतिहास; ‘लाेकमत पुण्याचा लाेकाेत्सव’चे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:54 PM2023-09-28T13:54:05+5:302023-09-28T13:54:34+5:30
पाेलिस उपायुक्त विजय मगर; ‘लाेकमत पुण्याचा लाेकाेत्सव’ या गणेशाेत्सवावरील काॅफीटेबलचे प्रकाशन...
पुणे : ‘गणपती हे पुण्याचे आराध्य दैवत मानले जाते. या गणेशाेत्सवाविषयीचे ‘लाेकमत पुण्याचा लाेकाेत्सव’ हे काॅफी टेबल बुक गणेशाेत्सवाचा इतिहास उलगडणारे महत्त्वाचा दस्तावेज आहे,’ असे मत पुण्याच्या वाहतूक विभागाचे पाेलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी व्यक्त केले.
‘पुनित बालन ग्रुप’ प्रस्तुत व लाेकमतच्या ‘ती’चा गणपती उत्सवाअंतर्गत ‘लाेकमत - पुण्याचा लाेकाेत्सव’ या पुण्यातील गणेशाेत्सवावर आधारित काॅफीटेबल बुकचे बुधवारी (दि. २७) प्रकाशन झाले. याप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी पुनित बालन ग्रुपचे प्रमुख आणि श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनित बालन, ‘लाेकमत’चे संपादक संजय आवटे आदी उपस्थित हाेते. या काॅफीटेबल बुकच्या निर्मितीत न्याती ग्रुपचे सहकार्य लाभले.
गणेशाेत्सव सुरू करताना भाऊसाहेब रंगारी आणि लाेकमान्य टिळकांची भूमिका याबराेबरच पर्यावरणपूरक गणेशाेत्सव अशा अनेक मुद्द्यांचा समावेश असलेले हे काॅफीटेबल बुक हे गणेशाेत्सवाचा संदर्भग्रंथ ठरेल, असा विश्वास संजय आवटे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
....
पुण्यातील गणेशाेत्सवाची अगदी प्रारंभापासून माहिती देणाऱ्या काॅफीटेबलचे प्रकाशन करताना खूप आनंद हाेत आहे. हे काॅफीटेबल तयार करण्यात ‘लाेकमत टीम’चा माेलाचा वाटा राहिला आहे. या काॅफीटेबलमधून गणेशाेत्सवाचा पूर्ण इतिहास समाेर आणण्याबराेबरच पुण्यामध्ये गणेशाेत्सवाची पायाभरणी भाऊसाहेब रंगारी आणि लाेकमान्य टिळक यांनी कशी आणि का केली, याविषयीचा उलगडाही यातून झाला आहे. गणेशाेत्सव या पुण्याच्या लाेकाेत्सवाची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल लाेकमतचे मन:पूर्वक आभार!
- पुनित बालन, विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट
लाेकमतच्या विविध उपक्रमांत न्याती ग्रुप नेहमीच सहभागी असते. लाेकमत ‘ती’चा गणपती उपक्रमाअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या काॅफीटेबल बुकमध्ये आम्हाला याेगदान देता आले, याचा खूप आनंद आहे. यातून गणेशाेत्सवाविषयी पूर्ण मराठीतून माहिती देणारा दस्तऐवज सामान्यांपर्यंत पाेहाेचला आहे.
- हरीश श्राॅफ, संचालक, न्याती ग्रुप, सेल्स ॲंड मार्केटिंग