शिरोळे घराण्याचा इतिहास त्यागाचा
By admin | Published: December 26, 2016 03:41 AM2016-12-26T03:41:40+5:302016-12-26T03:41:40+5:30
महाराजांच्या काळापासून सध्याच्या शिवाजीनगर म्हणजेच मूळच्या भांबुर्डे गावाची सांभाळलेली वतनदारी तसेच पानिपतच्या
पुणे : ‘‘महाराजांच्या काळापासून सध्याच्या शिवाजीनगर म्हणजेच मूळच्या भांबुर्डे गावाची सांभाळलेली वतनदारी तसेच पानिपतच्या युद्धात शेखोजी शिरोळे यांनी केलेले बलिदान इथपासून ते फर्ग्युसन कॉलेज, पुणे महानगरपालिका या संस्थांसाठी आपली जमीन दान करण्यापर्यंत शिरोळे घराण्याचा इतिहास हा त्यागचाच राहिला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी नुकतेच केले.
शिरोळे घराण्याच्या नाममुद्रा (लोगो) अनावरणप्रसंगी आयोजित एका अनौपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे, सिद्धार्थ शिरोळे तसेच शिरोळे घराण्याच्या सर्व पिढ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
समाजहितासाठी त्यागाची हीच परंपरा इथून पुढच्या काळातही अशीच चालू राहणार असल्याचा विश्वास अनिल शिरोळे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात शिरोळे घराण्याच्या लोगोचे अनावरणदेखील करण्यात आले.(प्रतिनिधी)