इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे; फुले चित्रपटावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:58 IST2025-04-10T13:57:40+5:302025-04-10T13:58:45+5:30

फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलं आहे, कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत

History should be presented as history; Bhujbal's reaction on the film Phule | इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे; फुले चित्रपटावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे; फुले चित्रपटावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

पुणे : प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'फुले' सिनेमाची सध्या चर्चा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारीत हा सिनेमा आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेल्याचं समजतंय. सिनेमासंबंधी जो वाद निर्माण झालाय, त्यामुळे मेकर्सने 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केलं आहे. 

भुजबळ म्हणाले, सिनेमाच्या टीमने मला स्पष्ट सांगितलं की, अशा प्रकारचे सिनेमांमध्ये थोडं स्वतंत्र घेऊन नाही ते पण दाखवले आहे. फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलं आहे. तो सिनेमाचा एक भाग आहे. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असे सांगितले. कर्मठ ब्राह्मण असेल त्यांनी फुले यांना त्यावेळेस विरोध केला, आणि ब्राह्मण देखील महात्मा फुले यांच्यासोबत लढत होते. त्यांना मदत करत होते. शाळा बंद करत होते त्यावेळी लहुजी वस्ताद साळवी यांनी मदत केली. दोन्ही बाजू आहेत. इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे.

ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी 'फुले' सिनेमा जातीभेदाला प्रोत्साहन देतोय असा आरोप केलाय. यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यानिमित्त रितेश यांनी बॉलिवूड हंगामाशी बोलताना 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, असं सांगितलं आहे. २४ मार्चला 'फुले' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यावेळी ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सिनेमाला विरोध दर्शवला.

Web Title: History should be presented as history; Bhujbal's reaction on the film Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.