बारामतीत सुप्रिया सुळे सक्षम नाहीत; तृप्ती देसाईंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 05:57 PM2023-05-12T17:57:34+5:302023-05-12T18:19:05+5:30

मला बारामतीतून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांच्या पाठिंब्याचे देखील फोन येत आहेत

History will be made in Baramati if 'BJP' nominates Claimed by Trupti Desai | बारामतीत सुप्रिया सुळे सक्षम नाहीत; तृप्ती देसाईंची टीका

बारामतीत सुप्रिया सुळे सक्षम नाहीत; तृप्ती देसाईंची टीका

googlenewsNext

बारामती : बारामती लोकसभा मतदार संघात जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात करणार आहे. मात्र बारामती जिंकायची असेल, भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिल्यास बारामतीत इतिहास घडवू शकते ,असा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी(दि ११) रात्री बारामतीत पत्रकारांशी बोलताना केला.

देसाई पुढे म्हणाल्या, शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येईल ,असे वाटले होते .मात्र त्या तेथे सक्षम ठरल्या नसल्याचे सांगून त्या बारामती मतदार संघातही सक्षम नसल्याचा टोला यावेळी देसाई यांनी लगावला. बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी नागरिकांकडून सांगितले जात आहे. अनेकांचे पाठिंब्याचे देखील फोन येत आहेत. त्या अनुषंगानेच मी दौऱ्याला सुरवात करणार असल्याचे देसाई म्हणाल्या.

या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार हे खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्यानंतर आम्हाला आनंद झाला होता, एखादी महिला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करत आहे. मात्र त्या पंधरा वषार्पासून बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असे वाटत होते. मात्र खासदार सुळे याच पुन्हा मतदारसंघात फिरताना दिसतात. इतक्या वषार्पासून काम करत असणारे कार्यकर्ते पदाधिकारी केवळ सतरंज्या उचलण्यापुरतेच आहेत काय,असा सवाल उपस्थित करून देसाई यांनी घराणे शाहीला विरोध केला.

Web Title: History will be made in Baramati if 'BJP' nominates Claimed by Trupti Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.