चायनीज न खाल्ल्याने एकाला उलथन्याने बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 04:23 PM2019-11-04T16:23:01+5:302019-11-04T16:28:30+5:30

चायनीज खाल्ले नाही म्हणून एकास चायनीज बनवण्याच्या उलथण्याने बेदम मारहाण करण्यात आली...

hit to person due to away not eating Chinese | चायनीज न खाल्ल्याने एकाला उलथन्याने बेदम मारहाण

चायनीज न खाल्ल्याने एकाला उलथन्याने बेदम मारहाण

Next

लोणी काळभोर : चायनीज खाल्ले नाही म्हणून एकास चायनीज बनवण्याच्या उलथण्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत मारहाण झालेला तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          याप्रकरणी अंबादास भालचंद्र काटकर ( वय ३३, रा.नामदेव पवार यांचे खोलीत, पवारवस्ती, फुरसुंगी फाटा ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज पवार व संकेत गायकवाड दोघे ( रा.कवडीपाट टोलनाका ,कदमवाकवस्ती, ता. हवेली. ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोलनाका नजीक घडला आहे. 
            फिर्यादी काटकर चायनिज राईस घरी नेण्यासाठी गेले होते तेथे योगेश लोंढे व  राज पवार, संकेत गायकवाड हे होते. मला योगेश त्यांना चायनिज खाऊन जा असे म्हणाला त्यावेळी त्यांनी नकार दिला व पार्सल न्यायचे आहे असे सांगितले असता राज पवार याने भेटतंय तर खा. लय मस्ती आली का, असे म्हणून शिवीगाळ केली. त्याला काटकर यांनी शिवीगाळ करू नकोस असे म्हणाले याचा त्याला राग आला. तो व गायकवाड हे शिव्या देत आले. त्यावेळी तिघांत थोडी बाचाबाची झाली. त्यावेळी दोघांनीही तेथील चायनिजच्या दुकानावरिल चायनिज बनविन्याचे ऊलधने घेऊन पवार याने डोक्यावर तर गायकवाड याने पाठीत मारले त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दूखापत होऊन त्यांचे डोक्यातुन रक्त येवु लागले. त्यानंतर पवार याने आमच्या नादाला लागला तर तुझे हातपाय गळ्यात अडकविन अशी धमकी देत तेथून गायकवाडसह निघून गेला. तेथे जमलेल्या लोकांनी विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. 

Web Title: hit to person due to away not eating Chinese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.