जेऊर येथे वाळू तस्करांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:20 AM2020-12-03T04:20:09+5:302020-12-03T04:20:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे नीरा नदीमधून वाळू काढणाऱ्या वाळू तस्करांवर जेजुरी पोलीसांनी धडक कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे नीरा नदीमधून वाळू काढणाऱ्या वाळू तस्करांवर जेजुरी पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी एक पोकलेन मशीन, एक ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे. तर दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
जेजूरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेऊर (ता.पुरंदर) येथील रसाळ महाराजांच्या मठाच्या मागे नीरा नदी पात्रात राजेंद्र मारूती धुमाळ हे पोकलेनच्या साह्याने वाळू काढत आहेत, अशी माहिती मंगळवारी पोलीसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी धाड टाकली. यावेळी मारूती धुमाळ हे पोकलेन मशीनच्या साहाय्याने नदी पात्रात वाळू काढत असल्याचे आढळले. तर रोहित मोतीलाल तांबे त्यांच्या स्वतःच्या ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक करत होते. पोलीस गाडी पाहून दोघेजण वाहने व पोकलेन सोडून पळून गेले. या ठिकाणाहून पोलीसांनी एक पोकलेन, एक महिंद्रा कंपनीचा अर्जुन ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे. अशा रितीने एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर असुन दोघांवर गुन्हा दाखल केले आहेत.