पत्नीच्या गुप्तांगाला चटके, बेदम मारहाण करत अत्याचार; नराधम पतीला अटक, कोंढव्यातील भयंकर घटना
By विवेक भुसे | Published: May 3, 2023 04:20 PM2023-05-03T16:20:52+5:302023-05-03T16:21:53+5:30
नराधमाने तुझा माज उतरवितो, म्हणत शिवीगाळ करुन पत्नीच्या डोक्यात, हाता, पायावर खलबत्याने मारहाण केली
पुणे : पत्नीचे हात पाय बांधून तिच्या नाजुक भागाला त्याने हीटरने चटके दिले. त्यामुळे ती भाजली असताना आरडाओरड करत असतानाही तिच्यावर बलात्कार केला. इतके करुनही थांबला नाही. कौयाचा कळस गाठून तिच्याबरोबर घृणास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोंढव्यातील आश्रफनगरमधील एका ४० वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी दुपारी १ ते रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ४ मुले आहेत. फिर्यादी यांच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून त्यांचा पतीला संशय आला. तो त्यांना हाताला धरुन बेडरुममध्ये घेऊन गेला. बाहेर मुले ओरडत असतानाही त्याने फिर्यादीचे हातपाय बांधले. तिच्याबरोबर घृणास्पद कृत्य केले. तुला खूप माज आला आहे. तुझा माज उतरवितो, म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी यांच्या डोक्यात, हाता, पायावर खलबत्याने मारहाण केली.
त्यांचा आरडा ओरडा ऐकून बाहेरुन मुलेही अधिक आरडा ओरडा करु लागली. तेव्हा त्याने दरवाजा उघडला. तेव्हा १६ व ११ वर्षाची मुलगी फिर्यादीकडे आल्या असताना ही मुलेदेखील माझी आहेत की नाही असे म्हणून मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोंढवा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.