स्वच्छ पाण्यासाठी भोर नगर परिषदेसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:52+5:302021-07-16T04:09:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : शहरामध्ये नगरपालिकेकडून काही दिवसांपासून काही भागात गढुळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच दीड वर्षापासून दिवसाआड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : शहरामध्ये नगरपालिकेकडून काही दिवसांपासून काही भागात गढुळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच दीड वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील पाणीपुरवठा स्वच्छ व नियमित करावा नागरिकांनी भोर नगरपरिषदेसमोर गुरूवारी धरणे आंदोलन केले. यानंतर शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले.
भोर शहरात काही दिवसांपासून अनेक भागात गाळ मिश्रीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांत साथीच्या आजार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नगरपालिकेकडुन गेल्या अनेक महिने दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. ४ दिवसात पाणीपुरवठा नियमित व स्वच्छ करू अशी ग्वाही नगरपालिका पाणीपुरवठा विभागच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शहराध्यक्ष सचिन मांडके, महिलाध्यक्षा दिपाली शेटे, स्वाती गांधी, पंकज खुर्द कपिल दुसंगे, राजेंद्र मोरे, निलेश कोंडे शालीनी सागळे, अमर ओसवाल, संतोष लोहकरे उपस्थित होते.
फोटो : भोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपलिकेसमोर आंदोलन करण्यात आले.