पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:20 PM2024-07-08T23:20:17+5:302024-07-08T23:21:29+5:30

रायगड जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी, अतिवृष्टीचा इशारा असल्याने निर्णय

Holiday declared for all schools in the district on Tuesday order by District Magistrate of Pune | पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

पुणे: प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील.

या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

याशिवाय, रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

Web Title: Holiday declared for all schools in the district on Tuesday order by District Magistrate of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.