पुणे जिल्ह्यातील शाळांना १९ नोव्हेंबरपर्यंत सुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 05:21 PM2021-11-13T17:21:20+5:302021-11-13T17:27:58+5:30
पुणे : राज्य शिक्षण मंडळाने २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुटी जाहीर केली होती. त्यानंतर ११ ...
पुणे : राज्य शिक्षण मंडळाने २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुटी जाहीर केली होती. त्यानंतर ११ ते १२ नोव्हेंबर दरम्यान शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, दिवाळीत कमी झालेल्या पाच सुट्या समायोजित करण्यात येत असल्याने शनिवारपासून (दि. १३) येत्या गुरूवार (दि. १८) पर्यंत सुटी जाहीर करण्याचा निर्णय झाला आहे. १९ तारखेला गुरू नानक जयंती असल्याने राष्ट्रीय सुटी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आता येत्या २० नोव्हेंबरपासून नियमितपणे सुरू होतील, अशी माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व अनुदानित / विनाअनुदानित शाळा / स्वयं अर्थसहाय्य शाळांच्या मुख्याध्यापकांनी वरील निर्णयाचे पालन करावे, असे निर्देश प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. दिवाळीच्या अनुषंगाने राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान शासनाचा परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती. तसेच ११ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ११ आणि १२ नोव्हेंबर हे दोन दिवस शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.