वेध विलिनीकरणाचे होळकरवाडी १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:13 AM2021-03-26T04:13:17+5:302021-03-26T04:13:17+5:30

मुलभूत सुविधा असल्या तरी नागरिकरणाला पुरक वातावरण हवे दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : होळकरवाडी हे अगदी कमी ...

Holkarwadi of Vedha Merger 1 | वेध विलिनीकरणाचे होळकरवाडी १

वेध विलिनीकरणाचे होळकरवाडी १

googlenewsNext

मुलभूत सुविधा असल्या तरी नागरिकरणाला पुरक वातावरण हवे

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : होळकरवाडी हे अगदी कमी नागरिकरण, कमी लोकसंख्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गाव. गावात पायाभूत सुविधा तुलनेने चांगल्या असल्या तरीही आता गावकरी मोठ्या प्रकल्पांच्या प्रतिक्षेत आहेत.

सुमारे ५ हजार लोकसंख्या असलेल्या आणि वार्षिक ४० लाखांचा महसूल असतानाही गावाचा कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. याआधी गावातील कचरा मंतरवाडी डेपोत टाकला जात असे पण आता तिथे गावाचा कचरा टाकू दिला जात नसल्याने तो गायरानात ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमार्फत टाकला जातो. गावाच्या सुरुवातीला असलेल्या पुलालगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. गावात नागरिकरण कमी असल्याने कचरा व्यवस्थापन करणे फार अवघड नाही, परंतु तरीही कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने परिसरात दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहे.

गावातील संपूर्ण भागात भूमिगत गटाराची कामे पूर्ण झाली असून राहिलेल्या जांभळे वस्तीवर ड्रेनेजची कामे सुरू आहेत. गावातील संपूर्ण सांडपाणी ओढ्यात सोडले जात असल्याने आम्हाला मल्लनिस्सारण प्रकल्प कधी मंजूर होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जी काम अद्याप झाली नव्हती ती कामे आता सुरू आहे. गावातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांचे विषय मार्गी लागलेले आहेत.

*कोट*

“गावात पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे. जेव्हा ग्रामपंचायत, गावातील नागरिकांना नागरी सुविधा देण्यात असमर्थ ठरते तेव्हाच गाव महापालिकेत घेतले जाते. आमचे गाव सुंदर व स्वयंपूर्ण आहे, सर्व सुविधा आम्ही देत आहोत, तर महापालिकेत घेण्याची आवश्यकता कायॽ”

-प्रज्ञा जांभळे, सरपंच

कोट

“ग्रामपंचायतीमार्फत दूषित पाणी पुरवठा होत असून आता याकडे महापालिकेने लक्ष द्यावे. त्याचबरोबर गावात शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडायला नको याची काळजीही घ्यायला हवी.”

-माधव गोपाळ थिटे, जेष्ठ नागरिक

फोटो ओळ

गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Web Title: Holkarwadi of Vedha Merger 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.