आगळ्यावेगळ्या प्रयोगाने पवित्र इंद्रायणी जलपर्णीमुक्त!

By Admin | Published: June 6, 2016 12:37 AM2016-06-06T00:37:44+5:302016-06-06T00:37:44+5:30

नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले

Holy Indraani is free from various experiments! | आगळ्यावेगळ्या प्रयोगाने पवित्र इंद्रायणी जलपर्णीमुक्त!

आगळ्यावेगळ्या प्रयोगाने पवित्र इंद्रायणी जलपर्णीमुक्त!

googlenewsNext

भानुदास पऱ्हाड,  शेलपिंपळगाव
नद्यांमधील जलपर्णीचा विळखा हा सगळीकडेच डोकेदुखीचा विषय ठरत असताना अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणीला मात्र आगळ्या-वेगळ्या यशस्वी प्रयोगाद्वारे जलपर्णीमुक्त करण्यात यश आले आहे. हे स्वच्छतेचे मॉडेल याच पद्धतीने राज्यातही राबवल्यास नद्या जलपर्णीतून मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकतील.
पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच नद्यांच्या पात्रातील पाण्याला जलपर्णीचा विळखा आहे. जलपर्णीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने ती हटविण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु जलपर्णीचा गुंतत चाललेला विळखा कायमस्वरूपी सोडविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. मात्र याला अपवाद ठरला तो आळंदी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय भगवानराव सोनटक्के यांनी केलेल्या प्रयोगाचा.
इंद्रायणीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरलेली होती. सोनटक्के यांनी एक अनोखी शक्कल लढविली आणि ते त्यात यशस्वीही झाले. इंद्रायणीच्या संपूर्ण पात्राला पुरेल इतके सुमारे १२५ प्लास्टीकचे रिकामे ड्रम आणले. त्यांना सळइने भोके पाडण्यात आली. एक इंचाचा वायररोप नदीच्या एका बाजूला घट्ट करून पाणी साठवण बंधाऱ्याच्या सुमारे ६०० मीटर अंतर दूर त्याला नदीच्या दुसऱ्या तीरावर पसरविण्यात आले. त्यानंतर एका पाठोपाठ एक
ड्रम रोपमध्ये ओवून ती बाजू
क्रेनच्या साह्याने उंचावून ड्रमचा हार बनविण्यात आला. नदीच्या पाण्यावर या हाराला पसरविण्यात आले. मधोमध होल केल्याने ते अर्धे
पाण्यात तरंगत राहिल्याने जलपर्णीला ड्रमच्या हाराचा आपोआप अडथळा निर्माण झाला.
त्यानंतर पाणीसाठवण बंधाऱ्याचे काही दरवाजे खुले करून उरलेल्या ६०० मीटर अंतरातील जलपर्णी सलग चार - पाच दिवस आदिवासी मजुरांनी मोठ्या मेहनतीने बांबू, लोखंडी हुक, लोखंडी आकडे आदी अवजारांच्या साह्याने पाण्यापासून दूर करून पात्र जलपर्णीमुक्त केले. सध्या इंद्रायणी नदीचे पात्र जलपर्णी विरहित असून, पात्रात स्वच्छ पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे चालू वर्षी पंढरपूर आषाढी पायीवारीसाठी आलेल्या माऊलीभक्तांना दुगंर्धीमुक्त पाण्यात पवित्र स्नान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतरांनीही राबवावा असा प्रयोग
वारंवार प्रयत्न करूनही जलपर्णीचा तिढा सुटत नव्हता. परिणामी शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. अखेर खूप विचार करून हा प्रयोग निश्चित करून अमलात आणायचे ठरवले. सर्वांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतरांनी हा प्रयोग राबवून नद्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
- दत्तात्रय सोनटक्के, पाणीपुरवठा विभागप्रमुख, आळंदी नगर परिषद

Web Title: Holy Indraani is free from various experiments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.