घरांची पडझड : कामगारांना घर देता का घर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:38 AM2018-02-03T02:38:15+5:302018-02-03T02:38:30+5:30
वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील धवलपुरी, रत्नपुरी, लालपुरी येथील कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने हजारो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.
वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील धवलपुरी, रत्नपुरी, लालपुरी येथील कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने हजारो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.
शेती महामंडळातील कामगारांना १९६५साली कायमचे राहण्यासाठी देण्यात आलेल्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झालेले असल्याने पडक्या धोकादायक घरात जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आलेली आहे. येथील कामगारांवर ‘घर देता का घर’ अशी आर्त हाक मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील जमिनीवर कसलेही उत्पादन न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामगारांना २००७ सालापासून आपली उपजीविका भागवण्यासाठी आधार नसल्याने व स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाच्याच घरात भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे. हजारो कुटुंबे आजही महामंडळाच्या आशेवर जीव मुठीत धरून पडक्या घरात आजही वास्तव्य करताना दिसत आहेत.
लोकप्रतिनिधींवर कामगारांचा अविश्वास
या कामगारांना ना घर, ना शेती, कोठेही उपलब्ध नसल्याने व शेती महामंडळाच्या राहत्या घरावर पत्र्याचे पान टाकण्यास कोणत्याही मंडळाचा अधिकारी फिरकत नसल्यामुळे गळक्या पडझड झालेल्या व जीर्ण झालेल्या धोकादायक घरात राहावे लागत आहे. पावसाळ्यात या घरात संसार पाण्यात राहातोय. पत्रे गळत असल्याने ताडपत्री अंथरून
त्यावर मात करण्यासाठी धडपड करताना
दिसतात.
मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी या हाजारो कुटुंबांना आजपर्यंत फक्त आश्वासन देऊन गेले ते परत फिरकलेच नाहीत. प्रत्येक सभेत या कामगारांना न्याय देण्याची आश्वासने लोकप्रतिनिधी न विसरता देत असतात. कामगार टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात मात्र मतदान घेऊन पुन्हा पाच वर्षांनी नव्याने सभा घेताना दिसतात, असा राजकारणी लोकप्रतिनिधींवर कामगार अविश्वास दर्शविताना दिसत आहेत.
या भागातील खासदार सुप्रीया सुळे यांनी १० वषार्पूर्वी धवलपूरी रत्नपूरी भागातील कामगारांच्या घरांची पहाणी करून झालेली दैयनीय अवस्था लक्षात घेऊन न्याय देण्यासाठी मंत्रालयासमोर कामगारासहीत उपोषण करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आज १० वर्ष पलटून गेले मात्र खासदार परत न आल्याने राजकारणी माणसावरचा विश्वास उडाला आहे. या कामगारांची शेतीमहामंडळी ८० कोटी असून व राहाते घर व दोन गुंठा जागा देण्यासाठी औरंगाबाद खंडपिठाने निर्णय देऊनही देण्यात आलेले नसल्याने हे कामगार घर का ना घाट का अशी अवस्था झालेली आहे. शेतीमहामंडळाने हजारो हेक्टरी जमिनी दुसºया धडधांडग्याना भाडे तत्वावर देण्यात आलेले आहेत. कोट्यावधी रुपए शेतीमहामंडळाला फायदा झालेला आहे. त्या पैसातून कामगारांची देणे दिल्यास कामगारांना न्याय मिळणार आहे. राहाते घर व परिसरात दोन गुंठे जागा उपलब्ध करून दिल्यास त्या कामगारांना न्याय मिळणार आहे.