उदापूर येथे होम आईसोलेट क्वारंटाइन सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:34+5:302021-05-18T04:10:34+5:30
या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांना दररोज सकाळी संध्याकाळी दोन अंडी दूध देण्यात येते. या सेंटरमधील रुग्णांची मोफत ...
या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांना दररोज सकाळी संध्याकाळी दोन अंडी दूध देण्यात येते. या सेंटरमधील रुग्णांची मोफत तपासणी उदापूर येथील डॉ. सी. के. पवार, डॉ. पुष्पलता शिंदे, डॉ. राहुल घुले, युवाशक्तीचे सदस्य दीपक चौधरी हे विनामूल्य रुग्णसेवा करीत आहेत.
या सेंटरसाठी सह्याद्री गणेश मंडळ उदापूरने २० उषा व गाद्या भेट दिल्या आहेत.
श्रीराम देवस्थान ट्रस्टने १० फॅन, शरद सहकारी बंकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य विनायक तांबे पाच हजार रुपये, ए.के.जी.के कंपनीचे मालक निखिल गाडेकर १ हजार अंडी, प्रकाश बनकर यांनी वाढदिवसाचा खर्च वाचवून तीन हजार रुपये, ह.भ.प.गणेश महाराज शिंदे यांनी रुग्णांना वाफ घेण्यासाठी १० मशीन, युवा शक्ती ग्रुप सदस्य ५ हजार, प्रवीण शिंदे यांनी सेंटरमध्ये गरम पाण्याच्या मशिन साठी ७ हजार रुपये दिले आहेत.