गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:20+5:302021-07-27T04:10:20+5:30

पुणे : प्रत्येकाला स्वप्नातले घर साकार करण्याची इच्छा असते. त्यासाठीच त्याला आर्थिक हातभाराची गरज असते. आता राष्ट्रीयीकृत बँकांचे ...

Home loans are cheap, but construction materials are expensive | गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग

Next

पुणे : प्रत्येकाला स्वप्नातले घर साकार करण्याची इच्छा असते. त्यासाठीच त्याला आर्थिक हातभाराची गरज असते. आता राष्ट्रीयीकृत बँकांचे गृहकर्ज स्वस्त झाली आहेत. मात्र, दुसरीकडे दिवसागणिक पेट्रोल, डिझेलच्या दरात होणारी वाढ, तसेच कोरोनामुळे सुरू असलेले निर्बंध यामुळे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी घराच्या किमती वाढल्या आहेत. गृहकर्ज स्वस्त असेल तरी वाढत्या महागाईचा सामना करत असताना घराच्या वाढलेल्या किमती बघून सर्वसामान्य व्यक्तीला घर घेणे आवाक्याबाहेर आहे. त्यांचे घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार? असा प्रश्न पडला आहे.

शहरात राहणाऱ्या, तसेच इतर ठिकाणाहून कामासाठी शहरात राहण्यास येणाऱ्या प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न असते. उत्पन्न बघता आर्थिक बजेटच्या बाहेर घरांच्या किमती वाढल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे वीट, वाळू, वीट, स्टील, सिमेंट तसेच आदी वस्तूंच्या दरात दुसऱ्या लॉकडाऊनच्या नंतर जवळपास २० ते ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे घराचे बांधकाम करणाऱ्या अथवा नवीन सदनिका घेण्याचे इच्छा असलेल्यांची चांगलीच अडचण झाली आहे. भाववाढीमुळे जमीन खरेदी करून बांधणे परवडत नाही. तसेच सदनिकेच्या किमती वाढल्याने अनेक बांधकामे संथ गतीने सुरू आहेत.

कोट

साहित्य विक्रेते म्हणतात

भाववाढीने बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. साहित्याच्या किमती वाढत असल्याने मागणी घटली आहे. व्यवसाय ६० ते ७० टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे.

-मनोहर खेसे, व्यावसायिक

----------------------------

कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रातील घडामोडी थंड आहेत. ग्राहकांची संख्या घटली आहे. अनेक कामे अर्धवट पडून आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रक्कम थकीत आहे.

-शेखर होले, व्यावसायिक

---------

कोट

कोरोनामुळे घरांच्या किमती कमी होतील असे वाटले होते. मात्र सिमेंट आणि स्टीलच्या वाढलेल्या किमती, इंधनाचे वाढते दर व सर्वच बांधकाम साहित्य महागल्याने किमतीत कोणताही फरक पडलेला नाही. असे बांधकाम व्यावसायिक सांगतात. त्यामुळे घर घेणे बजेटच्या बाहेर आहे.

- सूरज यादव

मासिक वेतन बघता राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देण्यास तयार नसतात. अपार्टमेंटमध्ये सदनिका घेण्यास परवडते, मात्र काही कायदेशीर कागदपत्रांमुळे अपूर्तेतेमुळे कर्ज घेण्यास अडचणी येतात. तर खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणे परवडत नाही.

- सागर शिंदे

….........

१) स्टेट बँक ऑफ इंडिया ६.८० टक्के

२) आयसीआयसी आय बँक

गृहकर्ज दर ६.७५ टक्के

३) बँक ऑफ महाराष्ट्र ६.७५ टक्के

४) बँक ऑफ बडोदा ६.७०

५) एचडीएफसी ६.७५

बांधकाम साहित्य

२०१८ २०१९ २०२० २०२१

सिमेंट २५० , २६० २६० ते २८० ३५० ते ३७५ प्रति बॅग

विटा ७.५० , ८.५०, ८.५० , १०.५० प्रति नग.

खडी -२००० ,२१००, २३०० , २३०० ते २४००

स्टील ४५ ४८ , ५२ ५७ ते ५८ रुपये किलो.

-------------------------

शहरापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे येणे महाग

मुख्य शहरापासून दूर घरांच्या किमती बजेटमध्ये आहेत. मात्र रोजचे जाणे येणे परवडत नाही. पेट्रोलने शंभरी गाठली आहे. घर ते काम असे जाऊन येऊन रोज शंभर पेट्रोलसाठी खर्च केले तर महिन्याला तीन हजार रुपये खर्च होतात. त्यामुळे आर्थिक गणित बिघडते. शहरातील घरांच्या किमती बघून घर घेणं स्वप्नच राहणार आहे.

Web Title: Home loans are cheap, but construction materials are expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.