'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 04:34 PM2020-07-25T16:34:26+5:302020-07-25T17:45:43+5:30

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार.

Home Minister Anil Deshmukh visited social media viral video oldaged ladyand gave one lakh help | 'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

Next
ठळक मुद्देआज या आज्जीबाईंची खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि एक लाखांची मदत दिली आहे.हा व्हिडिओ पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनीही त्यांचा हा काठी फिरवताना चा व्हिडिओ शेअर करत 'वॉरिअर आजी' असे त्याला कॅप्शन दिले.

पुणे : आयुष्यं म्हटलं की संघर्षही न चुकता आलाच. या संघर्षाला मग वयाचे बंधन तरी कोठे आले हो. ज्या वयात कुटुंबातील छोट्या छोट्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवत तसेच देवाजीच्या नामस्मरणात घरात वेळ घालवायचा असतो तिथे एक आजीबाई दहा माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या हिमतीवर पार पाडत आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील त्यावर मात करत तरुणांना लाजवेल अशी थरारक 'कामगिरी'करत आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार. पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज या आजीची खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि एक लाखांची मदत आणि साडी भेट म्हणून दिली आहे.



पुण्यातील हडपसर परिसरात या ८५ वर्षाच्या आजीबाई आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी तरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात काम केले. मात्र, आता ऊन , वारा, पाऊस एव्हाना कोरोनाकाळात देखील दोन वेळच्या अन्न पाण्यासाठी रस्त्यावर उतरुन मोठी कसरत करावी लागत आहे
.पण सोशल मीडियावर त्यांचा एक काठी फिरवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनीही त्यांचा हा काठी फिरवताना चा व्हिडिओ शेअर करत 'वॉरिअर आजी' असे त्याला कॅप्शन दिले.

Web Title: Home Minister Anil Deshmukh visited social media viral video oldaged ladyand gave one lakh help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.