फीडबॅक जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यानी केला फोन; पोलिसांच्या चांगल्या वागणुकीची त्यांनी दिली पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:07+5:302021-05-29T04:10:07+5:30

पुणे : एखाद्या ग्राहकाला कोणतीही सेवा दिल्यास त्याचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कॉल केला जातो याचा अनुभव अनेकांना ...

Home Minister calls for feedback; He acknowledged the good behavior of the police | फीडबॅक जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यानी केला फोन; पोलिसांच्या चांगल्या वागणुकीची त्यांनी दिली पावती

फीडबॅक जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यानी केला फोन; पोलिसांच्या चांगल्या वागणुकीची त्यांनी दिली पावती

Next

पुणे : एखाद्या ग्राहकाला कोणतीही सेवा दिल्यास त्याचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कॉल केला जातो याचा अनुभव अनेकांना असेल. पण पोलीस जनतेशी कशा प्रकारे वागतात. त्यांना उत्तम सेवा देतात का? हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यानीच एका व्यक्तीला फोन लावला. त्याच्याकडूनच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा अनुभव कसा होता हे जाणून घेतले आणि त्या व्यक्तीने पोलिसांचे काम उत्तम असल्याची पावती दिली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी काही विभागांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे उपस्थित होते. एखाद्या व्यक्तीने पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना योग्य ती सेवा आणि मदत दिली जाते का? याची तपासणी करण्यासाठी वळसे पाटील यांनी एका व्यक्तीला फोन लावला. रमेश राऊत असे त्यांचे नाव होते. पोलीस व्हेरीफिकेशसाठी पोलिसांचा आलेला अनुभव कसा होता? असे त्यांनी त्या व्यक्तीला विचारले तेव्हा राऊत यांनी पोलिसांनी खूप चांगली सेवा दिली असल्याचा निर्वाळा दिला.

पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याबरोबरच त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयात आलो आहे. पोलीस जनतेला कशा प्रकारे वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी एका व्यक्तीला कक्षातून फोन लावला आणि त्यांनी पोलिसांकडून चांगली वागणूक मिळाली असल्याचे सांगितले.

.....................

Web Title: Home Minister calls for feedback; He acknowledged the good behavior of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.