चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 07:09 PM2022-05-01T19:09:18+5:302022-05-01T19:09:42+5:30

पुणे शहरातील वारजे येथील पुलाजवळ एका कुटूंबावर काळाचा घाला घडून आला होता

Home Minister felicitates police constable sameer bagshiraj who saved child girl in pune | चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार

चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार

googlenewsNext

पुणे : पुणे शहरातील वारजे येथील पुलाजवळ एका कुटूंबावर काळाचा घाला घडून आला. जेमतेम  आठ - दहा दिवसांपूर्वी मुंबई - पुणे हायवे वरील वारजे भागातील पुलावर वाहनांचा गर्दीमध्ये मनोज पुराणिक यांच्या चारचाकीला मागील बाजूस ट्रकने धडक दिल्याने व पुढील वाहनांच्या मध्ये पुराणिक यांच्या गाडीचा अपघात झाला. यात त्यांची पत्नी दोन मुली असा परिवार होता. या अपघातात परिवारातील सर्वच जखमी झाले. परंतु त्यांची आठ वर्षाची मुलगी ही जास्त घाबरली तिला काय सुचेनासे झाले. अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागशीराज हे चिमुकलीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या या कामगिरीमुळे मुलीला जीवदान मिळाले. 

त्यानंतर या कर्तव्यदक्ष बजरंगीचे संपूर्ण राज्यातून कौतुक होऊ लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे कौतुक केले आहे. तर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी समीर बागशीराज त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच गृहमंत्री यांनी त्यांच्या या उत्तम कामगिरीचे कौतुक केले आहे. आणि बागशीराज यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.  

मुलीच्या वडिलांनी मानले होते आभार 

 या अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागशीराज यांनी हा प्रसंग पहिला जणू काही आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. म्हणून समोरील रक्तस्त्राव होत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीकडे पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. आणि काही क्षणात ते चिमुकलीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. वाहनाच्या गर्दीत बागशिराज धावपळ करत होते. या अपघातात चिमुकलीचे आई- बाबा आणि बहीण यांनाही गंभीर दुखापत झाली. परंतु ते कसे बसे रुग्णालयात दाखल झाले. पोलीस कर्मचारी बागशीराज यांनी या केलेल्या कामगिरीमुळे चिमुकलीचे बाबा मनोज पुराणिक यांनी खूप खूप आभार मानले, तुमच्या प्रयत्न, धावपळी मुळे माझी लेक वाचू शकली असे उद्गार त्यांनी काढले. 

Web Title: Home Minister felicitates police constable sameer bagshiraj who saved child girl in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.