न्हावरे परिसरात होम क्वारंटाइन रुग्ण फिरताहेत मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:21+5:302021-04-21T04:11:21+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन मोठ्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता येथील ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन मोठ्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता येथील ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी पंधरा दिवसांपासून व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे, मात्र तरीही येथील कोरोना रुग्णांची साखळी तुटता तुटत नाही. सध्या गावठाण परिसरात ७० हून अधिक अॅिक्टव्ह रुग्णसंख्या आहे. येथे कोविड सेंटर आहे पण ते हाऊसफुल झाले आहे.ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून होम क्वारंटाइन रुग्णांना कोण आवरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोज रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत. बेड मिळाला तर ऑक्सिजन, प्लाझ्मा, रेमीडिसिविर टंचाईमुळे नातेवाईकांची धावपळ वाढली असून, उपचार करणाऱ्या डॉक्टरांमधून चिंता व्यक्त होत आहे. क्वारंटाइन रुग्ण बाहेर फिरताना आढळून आला तर त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांना कळवली, असा निर्णय न्हावरे ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी केदारी यांनी दिली.