पुण्यात घरविक्रीत वार्षिक ७४ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:28+5:302021-07-19T04:08:28+5:30

पुणे : पुण्यातील घरांच्या विक्रीत २०२१ मध्ये वार्षिक पातळीवर ७४ टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये १७,४७४ घरे विकली गेली, ...

Home sales in Pune increase by 74% per annum | पुण्यात घरविक्रीत वार्षिक ७४ टक्के वाढ

पुण्यात घरविक्रीत वार्षिक ७४ टक्के वाढ

Next

पुणे : पुण्यातील घरांच्या विक्रीत २०२१ मध्ये वार्षिक पातळीवर ७४ टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये १७,४७४ घरे विकली गेली, तर २०२० मध्ये १०,०४९ घरे विकली गेली होती. याचे मुख्य कारण मुद्रांक शुल्कात झालेली घट आणि २०२० मधील ‘क्यू-२ लो-बेस’ हे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. पुण्यातील नवीन लाँचमध्येही ५२ टक्क्यांची वाढ होऊन २०२१ मध्ये २०,४७७ घरे विकली गेली. तर २०२०मध्ये १३,४३५ घरे विकली गेल्याचे अहवालातून लक्षात येते.

नाइट फ्रँक इंडियाने ‘इंडिया रिअल इस्टेट जानेवारी-जून २०२१’ या बाजारपेठेच्या अभ्यासाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतातील पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता या अशा सर्वोच्च बाजारपेठांमधून निवासी मालमत्ता वर्गांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे.

लाँचमधील सुदृढ वाढ हेही मुख्यत्वे लो-बेस प्रभाव आणि कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत कमी कठोर लॉकडाऊन यांच्यामुळे झालेले आहे. सरकारने बांधकामाला परवानगी दिली आणि त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली. त्यामुळे नवीन प्रकल्पांचा विकास होण्यात मदत झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

----

चौकट

मुद्रांक शुल्काच्या दरात घट झाल्याने मिळाली चालना

पुण्यातील निवासी विक्रींमध्ये आणि सादरीकरणात विशेषतः क्यू-३ २०२० आणि क्यू-४ २०२० या कालावधीत मुद्रांक शुल्काच्या दरात घट झाल्यामुळे वाढ होऊ लागल्याचे दिसू लागले. हाच वेग क्यू-१ २०२१मध्येही सुरू राहिला. जागतिक साथीची दुसरी लाट आल्यावर हा वेग कमी झाला. क्यू-२ २०२१ मध्ये घरांच्या विक्रीत ७२ टक्क्यांची घट झाली आणि नवीन घरांच्या लाँचमध्ये ८७ टक्क्यांची घट झाल्याचे दिसले आहे.

-----

चौकट

पुण्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक विक्री

सूक्ष्म बाजारपेठांमध्ये पुण्याच्या पश्चिमेकडील भागात औंध, बाणेर, वाकड, हिंजवडी, बावधन, पाषाण यांचा समावेश आहे. तर पूर्वेकडील बाजारपेठेत विमाननगर, खराडी, वाघोली, हडपसर, धानोरी यांचा समावेश आहे. त्यांनी पुण्यातील घरांच्या विक्रीवर वर्चस्व कायम राखले. एच-१ २०२१ मध्ये पश्चिमेकडील बाजारपेठांचा नवीन विक्रीत सर्वाधिक म्हणजे ३९ टक्के वाटा, तर त्यानंतर पूर्वेकडील वाटा २३ टक्के होता.

----

कोट

मुद्रांक शुल्कातील सवलतींचा फायदा, गृहकर्जदर सर्वाधिक कमी असणे, मोठ्या घरांसाठी मागणी, आयटीच्या क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी, वाढीव बचत, पहिल्या लाटेनंतर आर्थिक सुधारणा आणि विकसकांनी दिलेली किमतीतील घट-सवलती यांचाही फायदा मिळाला. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत कमी मुद्रांक शुल्काची खिडकी बंद झाल्यावरही अनेक विकसक हे घर ग्राहकांसाठी मुद्रांक शुल्काचा भार सोसण्यास तयार होते. त्यामुळे ग्राहकांनी घरांची खरेदी केली. दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत गंभीर असतानाही अनेक ग्राहकांनी नवीन घरे खरेदी केली आहेत.

- परमवीर सिंग पॉल, संचालक, नाइट फ्रँक इंडिया, पुणे

----

सूक्ष्‍म बाजारपेठा एका दृष्टिक्षेपात : पुण्यातील निवडक ठिकाणच्‍या निवासी किमती

ठिकाण एच-१ २०२१ मधील एच१ २०२१ मधील वार्षिक बदल सहामाही बदल

किंमत (रुपये/चौ.मी.) किंमत (रुपये/चौ.फूट)

१) कोरेगाव पार्क १३९,९३२-१८२,९८८ १३,०००-१७,००० -२ टक्के ० टक्के

२) कोथरूड ८०,७३०-१३९,९३२ ७,५००-१३,००० -२ टक्के ० टक्के

३) एरंडवणे १४५,३१४-१९३,७५२ १३,५००-१८,००० -३ टक्के ० टक्के

४) बोट क्‍लब रोड १५६,०७८-२०९,८९८ १४,५००-१९,५०० -२ टक्के ० टक्के

५) खराडी ५७,०४९-६७,८१३ ५,३००-६,३०० -१ टक्के ० टक्के

६) वाघोली ३७,६७४-४९,५१४ ३,५००-४,६०० ० टक्के ० टक्के

७) धानोरी ४१,९८०-५१,६६७ ३,९००-४,८०० -१ टक्के ० टक्के

८) हडपसर ४९,५१४-६४,५८४ ४,६००-६,००० -३ टक्के ० टक्के

९) औंध ८३,९५९-१०२,२५८ ७,८००-९,५०० -२ टक्के ० टक्के

१०) बाणेर ६०,२७८-८६,११२ ५,६००-८,००० -२ टक्के -१ टक्के

११) हिंजवडी ५१,६६७-६३,५०८ ४,८००-५,९०० -३ टक्के -१ टक्के

१२) वाकड ५८,१२६-६६,७३७ ५,४००-६,२०० -१ टक्के ० टक्के

१३) मोशी ३९,८२७-४६,२८५ ३,७००-४,३०० -३ टक्के ० टक्के

१४) चिखली ३७,६७४-४४,१३२ ३,५००-४,१०० -३ टक्के ० टक्के

Web Title: Home sales in Pune increase by 74% per annum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.