पुण्यात घरविक्रीत वार्षिक ७४ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:26+5:302021-07-21T04:09:26+5:30
पुणे : पुण्यातील घरांच्या विक्रीत २०२१ मध्ये वार्षिक पातळीवर ७४ टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये १७,४७४ घरे विकली गेली, ...
पुणे : पुण्यातील घरांच्या विक्रीत २०२१ मध्ये वार्षिक पातळीवर ७४ टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये १७,४७४ घरे विकली गेली, तर २०२० मध्ये १०,०४९ घरे विकली गेली होती. याचे मुख्य कारण मुद्रांक शुल्कात झालेली घट आणि २०२० मधील क्यू-२ लो-बेस हे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. पुण्यातील नवीन लाँचमध्येही ५२ टक्क्यांची वाढ होऊन २०२१ मध्ये २०,४७७ घरे विकली गेली, तर २०२० मध्ये १३,४३५ घरे विकली गेल्याचे अहवालातून लक्षात येते.
नाइट फ्रँक इंडियाने 'इंडिया रिअल इस्टेट जानेवारी-जून २०२१' या बाजारपेठेच्या अभ्यासाच्या अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतातील पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता या अशा सर्वोच्च बाजारपेठांमधून निवासी मालमत्ता वर्गांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे.
-----
कोट
मुद्रांक शुल्कातील सवलतींचा फायदा, गृहकर्जदर सर्वाधिक कमी असणे, मोठ्या घरांसाठी मागणी, आयटीच्या क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी, वाढीव बचत, पहिल्या लाटेनंतर आर्थिक सुधारणा आणि विकसकांनी दिलेली किंमतीतील घट-सवलती यांचाही फायदा मिळाला.
- परमवीर सिंग पॉल, संचालक, नाइट फ्रँक इंडिया, पुणे