अवसरी खुर्द कोविड सेंटर येथे होमिओपॅथी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:47+5:302021-04-13T04:10:47+5:30
आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांना असोसिएशनच्या वतीने पत्र देऊन डॉक्टरांनी रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने उपचार सुरू केले आहेत. अवसरी ...
आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांना असोसिएशनच्या वतीने पत्र देऊन डॉक्टरांनी रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने उपचार सुरू केले आहेत. अवसरी खुर्द अभियांत्रिकी कॉलेज येथे आंबेगाव तालुका, शिरूर तालुका व अन्य काही तालुक्यांमधील साडेआठशेच्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेगाव तालुका होमिओपॅथिक मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांना पत्र देऊन शासनाच्या निर्देशाप्रमाणे उपचार करण्याची तयारी दाखवली आहे. याव्यतिरिक्त मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात देखील तसेच खासगी दवाखान्यातसुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दाखवली आहे.
याप्रसंगी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, उपसभापती संतोष भोर, सुहास बाणखेले, डॉ. प्रताप वळसे, डॉ. नवनाथ वरपे, डॉ. सुहास कहडणे, डॉ.समीर हिंगे आदी उपस्थित होते.