घरांना स्थळकाळानुरूप बांधकाम साहित्य वापरावे

By Admin | Published: January 23, 2017 02:18 AM2017-01-23T02:18:42+5:302017-01-23T02:18:42+5:30

पूर्वी माहिती, तंत्रज्ञान, वाहूतक व पैशांच्याअभावी, तसेच संरक्षणाच्या दृष्टीने शक्यतो गावातच स्थानिक दगड, माती, भेंडे किंवा विटांच्या जोड

Homes should be used for site construction materials | घरांना स्थळकाळानुरूप बांधकाम साहित्य वापरावे

घरांना स्थळकाळानुरूप बांधकाम साहित्य वापरावे

googlenewsNext

पूर्वी माहिती, तंत्रज्ञान, वाहूतक व पैशांच्याअभावी, तसेच संरक्षणाच्या दृष्टीने शक्यतो गावातच स्थानिक दगड, माती, भेंडे किंवा विटांच्या जोड भिंती बांधून, छतासाठी हवामानानुसार लाकडांवर पांढऱ्या मातीचा पेंड, कौल टाकावू वैरण, गवत, सरमाड, काड, पऱ्हाटीची ताटे, वृक्षांच्या फांद्या वापरत व बहुदा घरचेच मजूर व अर्धकुशल गवंड्यांकडून घरे बांधली जात. त्यामुळे त्यांचा खर्चतर कमी असेच, पण कोणत्याही ऋतूत ते पर्यावरण पुरकही असत.
जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावाबाहेर शेतात शक्यतो दगडांच्या पवळी रचून त्यावर लाकूड व पाला-पाचोळ्यांचे छप्पर करून संरक्षणासाठी कडेने दगडांच्या पवळी किंवा बाभळीच्या काट्या लावून एकच रस्ता ठेवत. तो काट्यांच्याच झोप्याने बंद करत. पण अलीकडे लोकसंख्या, बागायत, संरक्षण, बांधकाम साहित्य, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान व पैरण वाढत गेल्याने सोयीच्या दृष्टीने थोडे दूर शेतात वेगळे बांधकाम साहित्य वापरून घरे तयार होऊ लागली.
सधन लोकांनी वारेमाप खर्च करून जरी मोठी घरी बांधली असली, तरी अलीकडे हवामान, शेतमालाच्या किमती, सरकारी धोरणे वारंवार बदलत असल्याने काढून त्याच जाड मजबूत भिंतीवर टी अँगल फरशी किंवा स्लॅब टाकता येतो व तोच पत्रा किंवा कौल लाकडी किंवा लोखंडी फ्रेमसह वरच्या मतल्यासाठी वापरला तर जागेची व पैशांची तर बचत होतेच; पण स्लॅबवर मजला झाल्याने खालचे घर तापत नाही.
पावसात गळत नाही. त्यावर थोडी गच्ची सोडून त्यावर वाळवणे उन्हाळ्यात हवेशीर झोपणे, उन्हाळी कामे करणे, गप्पा मारणे, बैठका यासाठी वरून सर्व परिसर व शेत दृष्टिक्षेपात येत असल्याने संरक्षणही चांगले होते किंवा कालांतराणे घराची जागाच बदलायची झाली, तरी दुसरीकडे वीट व स्लॅब बांधकामाप्रमाणे हे साहित्य वाया न जाता उचलून दुसरीकडे नेता येते. त्यातून घर विहिरी, मोठे कंपाउंट बांधता येतात.
सुरवातीला जास्त पैसे नसतील, तर पहिल्या टप्प्यात जमिनीचा परवर मुरूम टाकून ठोकून घ्यावा व त्यावर घासलेली शहाबादी फरशी टाकावी. किंवा रंग टाकून सिमेंटचा कोबा करावा. पुढे थोडीजरी ऐपत वाढली तरी त्यावर हव्या त्या रंगाची डिझाईनची कमी खर्चातील प्लॅस्टिक मॅट टाकली, तर कमी खर्चात घर आकर्षक तर दिसतोच; पण ते हिवाळ्यात फार थंडही पडत नाही.
व उन्हाळ्यात अंथरूण न टाकता त्यावर बसता किंवा झोपता येते. घरात लहान मुले असतील तर ते फारच उत्तम असते. एकदा टाकलेली मॅट ५-६ वर्ष वापरून हळूच काढली तर तिचा उपयोग वाळवण, पावसात झाकण टाकण्यासाठी होतो. कमी खर्चात पुन्हा नवीन डिझाईनची आकर्षक मॅट टाकून नवीन परवर केल्याचे समाधान मिळते.
शेतीत कधी आर्थिक फटका बसेल व योजलेल्या कामांचे इमले कोसळतील हे सांगता येत नसल्याने सामान्य शेतकऱ्याने ऐपत नसताना ‘रिन काढून सण’ या म्हणीप्रमाणे एकदम चांगलेच बांधकाम साहित्य वापरून मोठे घर बांधण्यापेक्षा स्थळ काळानुरूप बांधकाम साहित्य वापरून टप्प्याटप्प्याने घर सुधारणा करत गेले तर एकदम ताण येणार नाही.
प्रथम जास्त पैसे नसतील तर अशा घरांवरही तूर्त कौल किंवा पत्रा टाकावा व आतून त्याला सिलिंग करावे. म्हणजे घर तापणार नाही. पुढे ऐपत आल्यावर तोच पत्रा पुढे चांगला हळू हळू शेतकऱ्याची ऐपत वाढत गेली तर गरजेनुसार त्या घराला व्हरांडा, चांगली फरशी, चांगले कंपाउंड, पी.ओ.पी. करता येते. पण प्रथमच ऐपत नसताना दुसऱ्याने गळ्यात सोन्याची सरी घातली म्हणून आपण आजच निदान दोरी तरी बांधावी या वृत्तीतून तीच दोरी कधी गळ्यातला फास होईल हे सांगता येत नसल्याने शेतकऱ्यांनी ऐपतीनुसार स्थळकाळ परत्वे बांधकाम साहित्य वापरून तूर्त घर बांधावे व पुढे गरजेनुसार त्याचा विस्तार करावा.

Web Title: Homes should be used for site construction materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.