होनेवादी शाळा ठरली जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:31+5:302021-02-10T04:10:31+5:30
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारित नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यानुसार होनेवाडी ...
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारित नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यानुसार होनेवाडी शाळेत नवीन वर्षात नऊ दिवस नऊ निकष पूर्ण करून वेगवेगळे उपक्रम राबवले. यामध्ये शालेय परिसरात, बाहेर, बोर्ड लावणे, व्यसनमुक्तीसाठी एक पणती, जागतिक कर्करोग दिनी प्रतीकात्मक होळीचे दहन, तंबाखू दुष्परिणामांचे पोस्टर, घोषणाबाजी, बाह्य भिंतीपासून १०० यार्ड परिसर रेखांकित क्षेत्र असे अनेक उपक्रम राबवून नऊ निकष पूर्ण करून जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळेचा मान मिळवला. याकामी गट शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे, वंदना शिंदे, केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे, सलाम मुंबई फाउंडेशनचे आदेश नांदवीकर, जिल्हा समन्वयक डफळ यांचे मार्गदर्शन मिळाले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या सहकार्यातून व शाळेचे मुख्याध्यापक यशवंत गाडीलकर, उपक्रमशील आदर्श शिक्षिका छाया मापारी यांच्या विशेष प्रयत्नातून शाळेला हे यश प्राप्त झाले. या यशाबद्दल माजी आमदार गावडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई गावडे, पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
फोटो : जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा म्हणून प्रथम क्रमांक आल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार करताना माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे.