पुणे शहर पोलिसांना होंडा मोटारसायकल यांच्याकडून १०० दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 06:19 PM2019-03-29T18:19:44+5:302019-03-29T18:20:34+5:30

पुणे शहरात १०२ पोलीस चौक्या असून, सर्वजण कामात सुलभता आणण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.

Honda given 100 bikes to Pune city police | पुणे शहर पोलिसांना होंडा मोटारसायकल यांच्याकडून १०० दुचाकी

पुणे शहर पोलिसांना होंडा मोटारसायकल यांच्याकडून १०० दुचाकी

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटी अंतर्गत भविष्यात आणखी ८० दुचाकी पोलिसांना देण्यात येणार

पुणे : शहरातील पोलिसांना होंडा मोटारसायकल यांच्याकडून १०० नवीन होंडा (लिवो) या दुचाकी देण्यात आल्या आहेत. सी एस आर अंतर्गत देण्यात आल्या असून, लवकरच बीट मार्शल आणि ट्रॅफिक कॉन्स्टेबल यांना देण्यात येणार आहेत. 
पुणे शहरात १०२ पोलीस चौक्या असून, सर्वजण कामात सुलभता आणण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत भविष्यात आणखी ८० दुचाकी पोलिसांना देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर पोलीस कॉन्स्टेबल यांना १३८ क्वार्टर मिळुन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यासाठी वेगळी नियमावली बनवली असून लवकरच कॉन्स्टेबल यांना क्वार्टर देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर ज्या महिला कर्मचाऱ्यांना लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी पाळणाघर सुरू करणार असल्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी याप्रसंगी सांगितले.
होंडाचे हरभजन सिंग म्हणाले,  पोलिसांचे काम खरच कठीण असते, असे कुठलेच काम नाही की ते पोलिसांना करावे लागत नाही. काहीही झालं तरी पोलीस येईपर्यंत नागरिक काहीच करत नाहीत.
यावेळी होंडा चे डेप्युटी डायरेक्टर जनरल हरभजन सिंग, मि. मॅनो, विवेक तनेजा, सरहद प्रधान, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, स्वप्ना गोरे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.


 

Web Title: Honda given 100 bikes to Pune city police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.