‘दगडूशेठ’मंदिरातील महिला सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, गणपती मंदिराच्या परिसरात सापडलेले १२ हजार पोलिसांकडे सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 02:27 PM2018-02-08T14:27:42+5:302018-02-08T14:27:49+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेच्या परिसरात मंदिराच्या महिला सुरक्षारक्षकाला १२ हजार रुपये रोख रक्कम रस्त्यावर पडलेली आढळली.

The honesty of the women security guard in 'Dagaduhesh', handed over to 12,000 police personnel found in Ganpati temple premises. | ‘दगडूशेठ’मंदिरातील महिला सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, गणपती मंदिराच्या परिसरात सापडलेले १२ हजार पोलिसांकडे सुपूर्द

‘दगडूशेठ’मंदिरातील महिला सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, गणपती मंदिराच्या परिसरात सापडलेले १२ हजार पोलिसांकडे सुपूर्द

Next

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेच्या परिसरात मंदिराच्या महिला सुरक्षारक्षकाला १२ हजार रुपये रोख रक्कम रस्त्यावर पडलेली आढळली. आजूबाजूला चौकशी केली असता, कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षारक्षक रुपाली शेडे यांनी याबाबत ट्रस्टच्या विश्वस्तांना कळविले. एवढी मोठी रक्कम स्वत: न घेता प्रामाणिकपणे फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये जमा करुन शेडे यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून ही रक्कम फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, व्यवस्थापक तानाजी शेजवळ, सुरक्षारक्षक रुपाली शेडे आदी उपस्थित होते.     
डॉ. बसवराज तेली यांनी या महिला सुरक्षारक्षकाचे याकामाबाबत कौतुक केले. सुनील रासने म्हणाले, मंदिरामध्ये दिवसभर मोठया प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे गर्दीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. परंतु, ट्रस्टच्या सुरक्षारक्षकांना अशी रक्कम किंवा वस्तू सापडल्यास त्या ट्रस्टकडे जमा केल्या जातात. त्यामुळे सुरक्षारक्षकांकडून ही एक प्रकारे चांगली सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: The honesty of the women security guard in 'Dagaduhesh', handed over to 12,000 police personnel found in Ganpati temple premises.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.