संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:58 PM2018-08-13T18:58:39+5:302018-08-13T19:00:37+5:30

दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाईने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली.

For the honor of Constitution, youth's on road in Pune | संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर

संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर

Next

पुणे : दिल्लीत काही समाजकंटकांकडून संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील गुडलक चाैकात तरुणाई रस्त्यावर उतरली. फेसबुकवरील तरुणाईने स्थापन केलेल्या एका ग्रुपने संध्याकाळी संविधानाची प्रस्तावना अाणि भारतीय झेंडे हातात धरत निदर्शने केली. या तरुणाईला पाठींबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, पत्रकार संजय अावटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे अादी उपस्थित हाेते. 

    यावेळी संविधानचा जयजयकार करणाऱ्या घाेषणा देण्यात अाल्या. तसेच संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव घाेषनेरुपी करुन देण्यात अाली. शेकडाे तरुण गुडलक चाैकात जमा झाले हाेते. पाेलिसांचा माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. 'संविधान के सन्मान मै, हम उतरे मैदान मै' अशा घाेषणा यावेळी देण्यात अाल्या. तरुणाईने हातात संविधानाच्या प्रस्तवानेची प्रत तसेच भारताचा झेंडा घेतला हाेता. तसेच 'मेरा संविधान मेरा अभिमान' असे लिहीलेले अनेक फलकही हातात धरण्यात अाले हाेते. 

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिल्लीतल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी अाम्ही सर्व भारतीय अाज पुण्यात जमलाे अाहाेत. दिल्लीतील घटनेचा जाहीर निषेध अाम्ही करत अाहाेत. संविधान जाळणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाई करावी. पुन्हा देशात काेणी संविधान जाळण्याचा विचार करणार नाही अशी भीती घालायला हवी. संविधान अाम्हा भारतीयांची अाेळख अाहे अाणि त्यावर काेणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर अाम्ही त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करु. 21 व्या शतकात संविधान वाचवण्यासाठी अापल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय हे समाज म्हणून अपयश अाहे. अांबेडकरांनी पुराेगामी विचारांनी हे संविधान लिहीलं अाहे. ज्याची जगात प्रशांसा हाेत अाहे. असं संविधान जाळलं जात असताना त्यावर कुठलिच प्रतिक्रीया उमटत नाही, हे दुर्दैवी अाहे. भारताच्या रस्त्यारस्त्यावर लाेकांनीशांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उतरायला हवं हाेतं. संविधान जाळल्याचा पहिला निषेध पंतप्रधानांनी दिल्लीत करायला हवा हाेता. संविधान वाचवण्याचं अांदाेलन हे कुठल्या पक्षाचं नाही तर विचार वाचवण्याचं अांदाेलन अाहे. 

 

Web Title: For the honor of Constitution, youth's on road in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.