हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:04+5:302021-03-24T04:10:04+5:30
हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या ९० व्या शहीद दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर शिवराम राजगुरू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ही ...
हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या ९० व्या शहीद दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर शिवराम राजगुरू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. २०२२ हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात क्रांतिकारकांचा पुरस्कार देऊन सन्मान व्हावा अशी हुतात्माप्रेमींची मागणी आहे. देशात एकाही क्रांतिकारक, शहिदांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केलेला नाही. हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे व देशासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांचे सन्मान पर्व सुरू करावे, तसेच या तीनही क्रांतिकारकांचे छायाचित्र १०० रुपयांच्या नोटेवर घ्यावे. तसेच लोहगाव येथील विमानतळाला हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे नाव द्यावे, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.