आळंदीत कोविड योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:13+5:302021-07-08T04:09:13+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुहास जाधव होते. याप्रसंगी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी.जी. ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुहास जाधव होते.
याप्रसंगी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी.जी. जाधव, शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, सचिव अंबालाल पाटील, खजिनदार नितीन जाधव, नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. विकास पाटील व डॉ. सुहास जाधव यांनी कोरोनाकाळातील केलेल्या कामाचा आढावा घेतला.
डॉ. जाधव म्हणाले की, कोरोनाकाळात डॉक्टरांनी आपल्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष न करता रुग्णांना आरोग्यसेवा द्यावी. कोरोनामुळे सुमारे सातशेहून अधिक डॉक्टर्सचे निधन झाले असून त्यत्च्या कुटुंबीयांना शासनाने मदत करण्याची गरज असल्याचे डॉ. सुहास जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पाटील, प्रास्ताविक डॉ. विकास पाटील तर आभार डॉ. ज्योती माटे यांनी मानले.
०७ आळंदी
तीर्थक्षेत्र आळंदीत कोविड योद्ध्यांचा सन्मान करताना मान्यवर.