वडगाव कांदळीत परिचारिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:10 AM2021-05-14T04:10:15+5:302021-05-14T04:10:15+5:30
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या परिचारिका व त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वडगाव ...
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या परिचारिका व त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वडगाव कांदळीचे सरपंच रामदास पवार, उपसरपंच संजय खेडकर, साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते, माजी उपसरपंच शरद पाचपुते,ग्रामपंचायत सदस्य सचिन निलख, जिजाभाऊ भोर, पंढरीनाथ पाचपुते, संगीता भोर,सुवर्णा मुटके, उल्का पाचपुते, शाहिदा पठाण, शुभांगी निलख, सुजाता लांडगे ग्रामविकास अधिकारी एम. बी. वाघे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोना महामारी व इतर आजारांमध्ये रुग्णांची अहोरात्र सेवा करणारी, त्यांना धीर देणारी, आरोग्याची काळजी घेणारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी परिचारिका रुग्णांना सर्वांत जवळची वाटत असते. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आजही परिचारिकांचे महत्त्वाचे योगदान आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने एक आंब्याचे झाड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे त्यांचे मनोबल वाढण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. आरोग्य सेवक नितीन निघोट, आरोग्य सहायिका सुनंदा कुमावत, आरोग्यसेविका मनीषा जाधव, आशा वर्कर सुनीता गुंजाळ,ज्योत्स्ना भोर, रोहिणी पवार,अनिता गुंजाळ,आदित्य गायकवाड, ऋषिकेश पाचपुते ग्रामपंचायत कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला.
१३ वडगाव कांदळी