गुरुपौर्णिमेनिमित्त क्रीडा शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:06+5:302021-07-26T04:09:06+5:30

यामध्ये कबड्डी - दादासो आव्हाड, मोहन कचरे, दत्तात्रय चव्हाण, व्हॉलीबॉल - शिवाजी जाधव बॉक्सिंग - अमर भांडलकर, हिम्मत कौले, ...

Honor of sports teachers on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमेनिमित्त क्रीडा शिक्षकांचा सन्मान

गुरुपौर्णिमेनिमित्त क्रीडा शिक्षकांचा सन्मान

googlenewsNext

यामध्ये कबड्डी - दादासो आव्हाड, मोहन कचरे, दत्तात्रय चव्हाण, व्हॉलीबॉल - शिवाजी जाधव बॉक्सिंग - अमर भांडलकर, हिम्मत कौले, लॉनटेनिस- प्रदीप कुंचुर,दत्तात्रय बोराडे, कराटे -रविंद्र करळे, अभिमन्यू इंगोले योगा -महाजन सर बॅडमिंटन -गणेश सपकाळ, तनुजा सपकाळ, जिम ट्रेनर अनिल जगताप, विद्या प्रबोधिनी करिअर अकॅडमी घाडगे, संजय होळकर सोमेश्वर विद्यालय मूर्ती, प्राध्यापक लक्ष्मण मिटकरी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती, प्राध्यापक आशोक देवकर टीसी कॉलेज बारामती, अनिल गावडे, दादासाहेब शिंदे म.ए.सो चे कै. ग.भि. देशपांडे विद्यालय बारामती सचिन नाळे, जनहित प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय बारामती, दीपक नलावडे जेडी गावडे विद्यालय, पारवडी, प्रसाद रणवरे विद्या प्रतिष्ठानचे न्यू बालविकास मंदिर पिंपळी, सुभाष चव्हाण मेखळी हायस्कूल, तुळजाराम चतुरचंद इंग्लिश मीडियम स्कूलचे बास्केटबॉल शिक्षक अभि चव्हाण इत्यादींचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दत्तात्रय बोराडे यांनी गुलाब रोपे दिलेली होती. प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. मिलिंद शिरसागर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व तर शरदचंद्र धारूरकर यांनी बारामतीतील क्रीडा क्षेत्रातील यशस्वी घोडदौड याविषयी गौरवोद्गार काढले.

संभाजी होळकर यांनी बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमधील क्रीडाक्षेत्राचा आढावा घेतला व क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच सहकार्य राहील व क्रीडा विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार नवनवीन क्रीडांगणे व क्रीडा सुविधा उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली. आभार राजेंद्र खोमणे यांनी व्यक्त केले.

बारामती येथे जिल्हा क्रीडा संकुलमध्ये क्रीडा प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

२५०४२०२१-बारामती-०३

Web Title: Honor of sports teachers on the occasion of Guru Poornima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.