‘ती’च्या जन्माचे स्वागत करणा-यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:16 AM2017-10-22T02:16:55+5:302017-10-22T02:16:57+5:30
जुनी जेजुरी येथे बळीराजापूजन, शेतकरी सन्मान, औजारपूजन, सफाई कामगार महिलांना साडीचोळी-मठाई वाटप आदी कार्यक्रमांसह कन्याजन्माचे स्वागत करण्यासाठी मुलींच्या नावे मुदतठेव करून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला.
जेजुरी : जुनी जेजुरी येथे बळीराजापूजन, शेतकरी सन्मान, औजारपूजन, सफाई कामगार महिलांना साडीचोळी-मठाई वाटप आदी कार्यक्रमांसह कन्याजन्माचे स्वागत करण्यासाठी मुलींच्या नावे मुदतठेव करून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला. बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान जेजुरी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. बलिप्रतिपदेनिमित्त दरवर्षी बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या बळीराजा, औजारपूजनासह, विविध समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्यात येतात.
या उपक्रमाचे यंदाचे नववे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यंदाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, वारकरी संप्रदायातील हभप दशरथतात्या जगताप यांच्या हस्ते शेती औजार व बळीराजापूजन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एन.डी. जगताप, नगरसेविका सविता जगताप, साधना लाखे, मंगल दोडके, अजयसिंह सावंत, डॉ. विनोदकुमार सिंह, संपत कोळेकर, सर्जेराव कदम, राजेश पाटील, पांडुरंग सोनवणे, आनंद नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कन्याजन्माचे स्वागत करणा-या १५ दाम्पत्यांचा सत्कार करून त्यांच्या कन्येच्या नावे बल्लाळेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मुदतठेव करून त्याची पावती दाम्पत्यांच्या हाती देण्यात आली. शहरातील स्वच्छता महिला कामगारांना साडीचोळी व मिठाईवाटप करण्यात आले. प्रास्ताविक संदीप जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन तानाजी जगताप, आयोजन शिवाजी जगताप, अजय जगताप, मोहन भोसले, छबन कामथे, महेश उबाळे, आदींनी केले.