Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ 

By अतुल चिंचली | Published: September 9, 2022 12:38 PM2022-09-09T12:38:35+5:302022-09-09T12:40:09+5:30

स्वराज्य ध्वजपथकाचे विशेष खेळ ....

Honorable Fourth Mahaganpati Sri Tulshibagh Public Ganapati Lakshmi road en route | Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ 

Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ 

Next

पुणे : तुळशीबाग गणपती मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात केली. पुण्यात तुळशीबागच्या महागणपतीची मूर्ती उंच आणि भव्यदिव्य असल्याने नेहमीच लक्षवेधी ठरली आहे. 

श्री तुळशीबाग गणपती फुलांच्या सजावटीने साकारलेला श्री गजमुख रथात बसून आला. लोणकर बंधूचे सनी व नगारावादन, स्वरूपवर्धनी, गजलक्ष्मी आणि ढोलताशांनी गजर केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष भारत माता रथ साकारला होता. तर मल्लखांबावरील प्रात्यक्षिकांनी सर्वांची मने जिंकली. 

स्वराज्य ध्वजपथकाचे विशेष खेळ 

स्वराज्य ढोल पथकाचे खेळ हे मिरवणुकीत विशेष ठरले. पथकात 21 तरुण - तरुणी सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात अन् ढोल ताशांच्या तालावर उत्तमरीत्या ध्वज नाचवले जात होते.

Web Title: Honorable Fourth Mahaganpati Sri Tulshibagh Public Ganapati Lakshmi road en route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.