जितो कोविड सेंटरला कोलदांडा घालण्याचा माननीयांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:12+5:302021-04-04T04:11:12+5:30

पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन (जितो) संघटनेच्या वतीने रेव्हेन्यू कॉलनीतील एका हॉटेलमध्ये उद्यापासून ʻकोविड सेंटरʼ सुरू करण्याचा ...

Honorable Mention of Jito Kovid Center | जितो कोविड सेंटरला कोलदांडा घालण्याचा माननीयांचा प्रयत्न

जितो कोविड सेंटरला कोलदांडा घालण्याचा माननीयांचा प्रयत्न

Next

पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन (जितो) संघटनेच्या वतीने रेव्हेन्यू कॉलनीतील एका हॉटेलमध्ये उद्यापासून ʻकोविड सेंटरʼ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी अडथळा आणण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला.

ʻजितोʼच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ʻकोविड केअर सेंटरʼ, सुरू करण्यात येत आहेत. कोणतेही शुल्क न आकारता केवळ सेवा भावनेने संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हजारो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असून ते बरे होऊन सुखरूप घरी पोहचले आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढताच संस्थेने विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या मालिकेत शिवाजीनगर भागातील स्पॅन एक्झेक्युटीव हॉटेलमध्ये रविवार (ता. ४) पासून कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. त्याबाबत समजताच रेव्हेन्यू कॉलनीतील काही रहिवाशांनी विचारपूस सुरू केली. इतकेच नव्हे तर स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे याही संबंधित ठिकाणी आल्या आणि विरोध दर्शवू लागल्या.

याबाबत, ʻलोकमतʼने एकबोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, “संबंधित हॉटेल रस्त्याच्या एका कोपऱ्यात आहे. ते इतरांना धोकादायक ठरू शकते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. त्यांना धोका होऊ शकतो. आजच काही पेशंट रिक्षाने येथे आले. महापालिकेने याबाबत निर्णय घ्यावा. संस्थेने अन्यत्र सेंटर सुरू करावे.”

ʻजितोʼने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सेंटर सुरूच झालेले नाही तर पेशंट कसे येतील ॽ आम्ही महापालिकेची परवानगी घेतली आहे. रहिवाशांनी प्रत्येक ठिकाणी असा विरोध केला तर आत्ताच्या आणीबाणीच्या परिस्थितीत काम करणार कसे, अशीही विचारणा ‘जितो’ने केली. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते रविवारी या केंद्रांचे उद्घाटन होणार आहे.

Web Title: Honorable Mention of Jito Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.