जेजुरीत कोरोनायोद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:13 AM2021-02-26T04:13:39+5:302021-02-26T04:13:39+5:30
या वेळी शिवव्याख्याते प्रमोद कारकर यांच्या व्याख्यानाने रसिकांची मने जिंकली. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाच्या ...
या वेळी शिवव्याख्याते प्रमोद कारकर यांच्या व्याख्यानाने रसिकांची मने जिंकली.
शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात माणसे जगविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष राजवर्धिनी जगताप, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी, सुवर्णस्टार क्लब व सेव्ह लाईफ युवा जेजुरी, उघडा मारुती मित्र मंडळ, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर मानवतेच्या भूमिकेतून अंत्यसंस्कार करणारे उपकार चॅरिटेबल ट्रस्ट जेजुरी, तसेच आनंदी हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुमित काकडे, ससून रुग्णालयाचे डॉ. प्रशांत दरेकर यांचा या वेळी कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
छत्रपती शिवरायांनी राजेपद समाजाच्या हितासाठी ,कल्याणसाठी वापरले. मराठी मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांच्यात गनिमी युध्द, सैन्य पारखण्याची बुद्धिमत्ता, रयतेविषयी जिव्हाळा, स्त्रियांविषयी आदर हे गुण होते. त्यांनी केलेल्या आदर्श राज्यकारभारातून लोकशाहीचे बीजे या देशात रुजली गेली आहेत, असे विचार जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप,पंकज निकुडे पाटील, उद्योजक पांडुरंग सोनवणे, माउली चव्हाण, नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख,महेश दरेकर ,दिंगबर उबाळे,सुरेश उबाळे, आनंद नाईक,अनंत देशमुख ,संपत कोळेकर, हरिभाऊ पवार, बापू विभाड,ज्ञानेश्वर बारसुडे, मनोज बारसुडे ,नितीन जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर. बोरावके यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन मराठा महासंघाचे अध्यक्ष विशाल बारसुडे, पदाधिकारी अनिकेत हरपळे,प्रवीण पवार, अनिल पोकळे,केतन उबाळे,संकेत कोंडे,बाळासाहेब जरांडे,शैलेश रणवरे,प्रशांत पवार, अक्षय बयास, सुशांत बारसुडे, मिलिंद भापकर यांनी केले.
२५जेजुरी सत्कार
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कोरोनायोध्दा ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांचा गौरव करताना.