वकील बार असोसिएशनच्या कार्यकारिणीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:05+5:302021-03-05T04:10:05+5:30
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, विद्या विकास मंदिर राजुरीचे मुख्याध्यापक जी. के. ...
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, विद्या विकास मंदिर राजुरीचे मुख्याध्यापक जी. के. औटी, रंगनाथस्वामी देवस्थान ट्रस्ट अणेचे अध्यक्ष विनायक आहेर, जानकू डावखर, लहू गुंजाळ, अविनाश औटी, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, एमबीएचे प्राचार्य राजीव सावंत, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील आदी उपस्थित होते.
जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुमित निकम म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील एकमेव लॉचे महाविद्यालय असून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन किंवा केस स्टडीसाठी असोसिएशनच्या माध्यमातून सदैव सहकार्य करू. या महाविद्यालयातून खऱ्या अर्थाने वकील घडतील व संस्थेचे नाव उज्ज्वल करतील, असा आशावाद या वेळी व्यक्त केला.
या वेळी ॲड. कुसूम उतळे, सचिन चव्हाण, सुजाता काळे, विनय ढमढेरे, सुजाता गाडेकर, संदीप टेमगिरे, रेवननाथ कांडेकर, सुधीर कोकाटे, सुदर्शन पारखे, गणेश भालेराव आदींचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जी. के. औटी यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा सानेगुरुजी विचार साधना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व समर्थ ज्युनियर कॉलेजचा माजी विद्यार्थी अजिंक्य डावखर यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी माती विभागातून निवड झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
०४ बेल्हा समर्थ
बेल्हा(ता.जुन्नर) येथे समर्थ शैक्षणिक संकुलात बार असोसिएशन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर.