पालकांकडून चक्क चारचाकी गाडी भेट देऊन ‘गुरूं’चा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:05 AM2018-08-27T01:05:42+5:302018-08-27T01:07:44+5:30

पिंपळे खालसा : १९७१ पासून ४३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; २०१४ पासून तीन शिक्षकांना भेट

 Honoring the 'Guru' by visiting fourchakas from parents | पालकांकडून चक्क चारचाकी गाडी भेट देऊन ‘गुरूं’चा सन्मान

पालकांकडून चक्क चारचाकी गाडी भेट देऊन ‘गुरूं’चा सन्मान

Next

कोरेगाव भीमा : पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेने १९७१ पासून ४३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा कायम राखत यावर्षी तीन विद्यार्थी राज्यात जिल्हा गुणवत्ता यादीत २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. एका विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असल्याने यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांच्यावतीने मार्गदर्शक शिक्षिकेस चारचाकी गाडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

पिंपळे खालसा ग्रामस्थांचा शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या योगदानासाठीची हे भेट राज्यात कात्ौुकाचा विषय झाली आहे. येथील शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्याची परंपरा १९७१ पासून कायम आहे. दरवर्षी या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर याअगोदर चौथीचे, तर गेल्या काही वर्षांपासून पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये झळकत आहेत. यात उत्तीर्ण होणाऱ्या मुलांच्या पालकांच्यावतीने शिक्षकांना लॅपटॉप, फ्रीज व इतर भेटवस्तू देण्यात येत होत्या. मात्र २०११ पासून शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करणाºया शिक्षकांना दुचाकी भेट देण्यात येत होती. शिष्यवृत्तीच्या यशाच्या परंपरा वाढल्याने ग्रामस्थांनी २०१४ पासून सर्व पालकांच्यावतीने शिक्षकांना तीन चारचाकी वाहने भेट देण्यात आलेली आहेत.
यावर्षी शाळेचे १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. एका विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्यावतीने मार्गदर्शकशिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना चारचाकी भेट दिली.
याप्रसंगी सरपंच राजाराम धुमाळ, उपसरपंच संदीप सुरसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ, शहाजी धुमाळ, संपत धुमाळ, विशाल धुमाळ, रमेश धुमाळ, समीर धुमाळ, शिवाजी धुमाळ, संतोष धुमाळ, पुष्पा धुमाळ, मंगल धुमाळ, शुभांगी धुमाळ, गुलाबराव धुमाळ, अप्पासाहेब धुमाळ यांच्यासह सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत शाळा : १९७१ पासून पिंपळे खालसा जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेची परंपरा कायम राहण्यासाठी व जास्तीत जास्त मुले शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता यादीत झळकण्यासाठी जून ते आॅक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत व आॅॅक्टोबरनंतर सकाळी ८ ते सायंकाळी ९ पर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जाते. पालकांचा विश्वास असल्याने परीक्षेत आजपर्यंत ४३२ विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे मार्गदर्शकशिक्षिका ललिता धुमाळ यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना भेट
गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी मार्गदर्शक शिक्षिकेस चारचाकी भेट देऊन सन्मानित करण्यात आले, तर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या हर्षदा शितोळे, ओम धुमाळ, गुरुदत्त धुमाळ या विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शकशिक्षिका ललिता धुमाळ यांच्यावतीने घड्याळ भेट देऊन सन्मानित केले.

Web Title:  Honoring the 'Guru' by visiting fourchakas from parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.