नवोदित डॉक्टरांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:20+5:302021-03-16T04:10:20+5:30
गावडेवाडी येथील शालेय इमारतीसाठी सिम्बॉयसिस संस्थेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. लवळे गावामध्ये स्थानिक एकूण ...
गावडेवाडी येथील शालेय इमारतीसाठी सिम्बॉयसिस संस्थेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. लवळे गावामध्ये स्थानिक एकूण चौदा डॉक्टर झाले आहेत. तेव्हा त्यांचाही विशेष सन्मान यावेळी ग्रामस्थांच्या वतीने झाला. गावातील डॉ.विजय हिरामण सातव आणि डॉ.सोनाली विजय सातव या डॉक्टर दाम्पत्यांचा आदर्श ठेवूनच गावामध्ये डॉ.शरद गोठे, डॉ.प्रसाद गुगळे, डॉ.प्रवीण कुदळे, डॉ.अक्षदा पोटे, डॉ.काजल कळमकर, डॉ.तेजल कळमकर, डॉ.स्नेहा सातव, डॉ.धनश्री राऊत-सातव, डॉ.शुभम सातव, डॉ.ऋषिकेश शितोळे हे सर्व डॉक्टर झाले आहेत. त्या सर्वांचा शिवतरे, नाथाजी राऊत आणि सरपंच नीलेश गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती दगडू करंजावणे, संचालक शिवाजी तांगडे, राम गायकवाड, भरत मारणे यांचाही सन्मान करण्यात आला.
लवळे ग्रामपंचायत ही मुळशी तालुक्यातील या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध झाल्यामुळे सरपंच व इतर सदस्यांचा सत्कार झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, उपसभापती विजय केदारी, सुनील चांदेरे, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, सचिन खैरे, सुहास भोते, स्वाती ढमाले, सिम्बॉयसिस संस्थेच्या नीलिमा घुगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊ केदारी आणि संजय आबा सातव यांनी केले, तर आभार नीलेश राऊत यांनी मानले.