शिंदे कुटुंबीयांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:34+5:302021-08-26T04:12:34+5:30
या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार रामभाऊ कांडगे, शरद बुट्टे पाटील, किरण मांजरे, शांताराम भोसले, चंद्रकांत गोरे, ...
या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार रामभाऊ कांडगे, शरद बुट्टे पाटील, किरण मांजरे, शांताराम भोसले, चंद्रकांत गोरे, मोतीकाका सांकला, प्रवचनकार ह.भ.प. ज्योतीताई गरूड, नितीन गोरे, दत्तात्रय पाखिरे, शाम पवार, कालिदास वाडेकर, मुकुंद आवटे तसेच दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे विश्वस्त श्यामराव पवार, अशोक डोंगरे, शिवाजी खराबी, बाळासाहेब भोपे, घनश्याम तुपे, के. के. झुनझुनुवाला, अभिमन्यू शेलार, नाझीम सिकिलकर, अशोक शेवकरी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
मामासाहेब शिंदे कुटुंबीयांकडून सामाजिक बांधिलकीतून संताजी संकुल, मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगी देण्यात आली. तर, दोन लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्यात आली. चक्रेश्वर मंदिर परिसरात मामांच्या स्मरणार्थ पेव्हर ब्लाॅक, वृक्षारोपण करून दशक्रियाविधीला उपस्थिती राहिलेल्याना तुळशीची रोपे आणि गौरवग्रंथाचे वाटप करण्यात आले.
मामासाहेब शिंदे कुटुंबातील संजय शिंदे, मीना शिंदे, सीमा शिंदे, राजेंद्र शिंदे, सांगाती शिंदे, संकल्प शिंदे, संदेश शिंदे, साक्षी खुडे, निकिता शिंदे, महेश सोनावणे, प्रशांत गोलांडे, नाझीम सिकिलकर यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन व्यंकटेश सोरटे व अशोक जाधव यांनी केले.
250821\img-20210824-wa0046.jpg
* फोटो - स्वातंत्र्य सेनानी कै. मामासाहेब शिंदे यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी वृक्षारोपण करताना.