दहावी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:36+5:302021-08-18T04:15:36+5:30

इंदापूर : महाराष्ट्र राज्यात दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या कल्याणी तुकाराम माने या बावडा येथील श्री ...

Honoring the student who came first in the state in the 10th examination | दहावी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार

दहावी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार

Next

इंदापूर : महाराष्ट्र राज्यात दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या कल्याणी तुकाराम माने या बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनीचा तिच्या सुरवड येथील घरी जाऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तिने भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी होण्याचा मानस असल्याचे हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.

सत्कारप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थिनीचे वडील तुकाराम माने व कुटुंबीयांशी संवाद साधला. कल्याणी माने हिचा इ. ११ वी व १२ वीचा शिक्षणाचा खर्च श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी करेल असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.

बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इ. १० वीची कल्याणी माने विद्यार्थिनी आहे. या शिक्षण संस्थेचे हर्षवर्धन पाटील हे अध्यक्ष आहेत. इतर वेगळा क्लास न लावता, विशेष मार्गदर्शन नसताना व दहा बाय दहा फुटाच्या कुडावरती पत्र्याचे छप्पर असलेल्या खोलीत राहून तिने गरीब परिस्थितीत राज्यात मिळविला. प्रथम क्रमांक ही विशेष अभिनंदनीय बाब असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

कल्याणी माने हिच्या राहत्या घराची स्थिती पाहून हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माने कुटुंबीयांना घरकुल देण्याची सूचना केली. याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव सरपंच किरण पाटील, दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, सुरेश घोगरे, रावसाहेब घोगरे, दशरथ घोगरे, प्रकाश घोगरे, जी.जे.जगताप उपस्थित होते.

सुरवड येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या कल्याणी माने हिचा घरी जाऊन सत्कार केला.

Web Title: Honoring the student who came first in the state in the 10th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.