ऊसतोड कामगारांच्या महीलाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:28+5:302021-03-10T04:11:28+5:30
यावेळी सरपंच रजनी कांबळे, शेतकरी महीला वृषाली भाऊसाहेब भोरडे, माजी सरपंच लत्ता सुभाष गायकवाड, सुयश महीला बचत गटाच्या अध्यक्षा ...
यावेळी सरपंच रजनी कांबळे, शेतकरी महीला वृषाली भाऊसाहेब भोरडे, माजी सरपंच लत्ता सुभाष गायकवाड, सुयश महीला बचत गटाच्या अध्यक्षा छाया गायकवाड, धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सारीका गायकवाड, महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा दिपाली गायकवाड, आदी सहभागी झाले होते.
त्याना माजी सरपंच संतोष गायकवाड, कांद्याचे व्यापारी भाऊसाहेब भोरडे, आपटीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे, रविंद्र कंद, राजाराम गायकवाड , सुधीर कंद, अभिजित गव्हाणे यांनी मदत केली.
शेतावर जाऊन शेत मजूर महिलाचा सत्कार ही संकल्पना शेतकरी महीला वृषाली भाऊसाहेब भोरडे याची. त्या म्हणाल्या विविध क्षेत्रात कतृत्वान महिलांचा सन्मान होतो. दुर्गम भागात शेतावर ऊन पावसाचा विचार न करता शेत मजूर महीला कष्ट करतात. तिच्या कुटुंबाचा व शेतकऱ्यांचा ती एक आधार असते. कष्टकरी महिलाचा ही सन्मान झाला पाहीजे.
सुयश महीला बचत गटाच्या अध्यक्षा छाया राजाराम गायकवाड यांनी स्वागत केले.तर संगिता भोसुरे यांनी आभार मानले.
डोंगरगाव (ता.हवेली) कष्टकरी कामगारांच्या ५० महिलाचा शेतकरी महीला वृषाली भाऊसाहेब भोरडे यांनी आपल्या निवासस्थानी सन्मान केला.