कोविडकाळात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:22+5:302021-03-16T04:10:22+5:30

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, महिला दक्षता समिती, शांतता समिती, कर्तव्यनिष्ठ महिला मंच आणि अनाहत स्वराज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

Honoring women police and health workers who were on duty during the Kovid period | कोविडकाळात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोविडकाळात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, महिला दक्षता समिती, शांतता समिती, कर्तव्यनिष्ठ महिला मंच आणि अनाहत स्वराज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सन्मान सोहळ्यात चव्हाण बोलत होत्या.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधूूून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील कोविडकाळात कर्तव्य बजावणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, ॲड. दिलीप जगताप, माय माऊली वृद्धाश्रमाचे विठ्ठलराव वरुडे पाटील, जितेंद्र मुकादम, महिला शांतता कमिटीच्या सदस्या व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भारती विद्यापीठ कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सिंधू जाधव, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा देशपांडे, अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका वर्षा शर्मा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एनएसएस. विभाग समन्वयक, सविता ईटकरकर, सिमाँन, आय. टी. कम सर्विस इंडस्ट्रीच्या एच. आर. गौरी पाटील, महापालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. विद्या नागमोडे, विणा साहू यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार असिफ सय्यद व श्रीधर पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन ॲड. दिलीप जगताप यांनी केले. तर अपूर्वा ठाकरे यांनी आभार मानले.

Web Title: Honoring women police and health workers who were on duty during the Kovid period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.